राज्य

कराडकरांना तासवडे टोल 100 % माफ

काँग्रेस नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या आंदोलनाला यश

तासवडे टोलनाकाच्या 20 किमी परिसरातील स्थानिकांना 100% टोलमाफी

कराड : काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या आंदोलनाची घोषणा केल्यानंतर ३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी 9 वाजलेपासून पुणे ते कोल्हापूर या महामार्गांवरील आंदोलनाला यश आले असून किणी टोलनाका,कोल्हापूर, तासवडे टोलनाका,कराड, आनेवाडी टोलनाका,सातारा व खेड शिवापूर टोलनाका,पुणे या सर्व टोल नाक्यांवर काँग्रेस नेत्यांनी कार्यकर्त्यांसह जनआंदोलन केले. तासवडे टोलनाक्यावर माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, आ. रवींद्र धंगेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सांगली शहर काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष झाकीर पठाण, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी चव्हाण, पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील, काँग्रेस नेते वसंतराव पाटील (आबा), संपतराव इंगवले, जिल्हा काँग्रेसचे नेते हिंदुराव पाटील, पाटण काँग्रेस अध्यक्ष अभिजित पाटील, जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमित जाधव, कराड दक्षिण काँग्रेसचे उपाध्यक्ष नितीन थोरात, कराड दक्षिण महिला काँग्रेसचे अध्यक्ष विद्याताई थोरवडे, जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा गीतांजली थोरात, कराड उत्तर महिला काँग्रेस अध्यक्षा मृणालिनी मोहिते, उमेश मोहिते, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, कराड दक्षिण युवक काँग्रेस अध्यक्ष दिग्विजय पाटील, वाहगाव सरपंच संग्राम पवार, सुरज पवार, कॅप्टन इंद्रजित जाधव, उंब्रज सरपंच योगीराज जाधव, अजित केंजळे, सुरेश पाटील, मधुकर जाधव, चंद्रकांत साळुंखे, अनिल मोहिते, दीपक लिमकर, दीपक पिसाळ, अविनाश नलवडे, पंकज पिसाळ आदी पदाधिकारी सहित काँग्रेस कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत व संपूर्ण रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, तरीही वाहन चालकांकडून टोल वसुली केली जात आहे. सदर टोल वसुली बंद करावी व जिल्ह्यातील स्थानिक गाड्यांना टोल माफ व्हावा म्हणून पुणे ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील चार टोल नाक्यावर काँग्रेस पक्षाने आज टोल विरोधी आंदोलन केले. सकाळी ९ वाजता सुरू झालेले आंदोलन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या लेखी आश्वासनानंतर दुपारी ३.३० वाजता तात्पुरते स्थगित करण्यात आले.

यावेळी मान्य झालेल्या मागण्या –

१) पुणे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत टोल मध्ये ५० टक्के सूट मिळावी ही काँग्रेसची मागणी होती. आजपासून प्राधिकरणाने २५ टक्के सूट देण्याचे मान्य केले व उर्वरित २५ टक्के सूट हायवेच्या वरिष्ठ अधिकारी तसेच केंद्रीय मंत्री स्तरावर चर्चा करून पुढील आठवड्यात निर्णय घेण्यातयेईल असे आश्वासन दिले आहे.

२) तसेच टोलनाका परिसरातील २० किमी च्या परिघातील स्थानिक वाहनांना टोल माफ करण्याच्या मागणीबाबत सकारात्मक विचार होऊन आजपासून टोलच्या २० की. मी. अंतरातील वाहनांना टोल माफ करण्याचे मान्य केले आहे.

वरील प्रमाणे मागण्या मान्य झाल्या व उर्वरित मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे टोल विरोधी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील टोलमाफीचे आंदोलन स्थगित करण्यात आले असून जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहनांचा टोल वसूल करू नये आणि करायचा निर्णय असेलच तर किमान ५०% च वसूल केला जावा हि आग्रहाची मागणी असल्याने त्यापैकी २५% टोलमाफी करण्याचे आश्वासन पूर्ण झाले असल्याने टोलमाफीचे आंदोलन यशस्वी झाले असून पुढील कार्यवाही पर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

आ. पृथ्वीराज चव्हाणांचा ठिय्या आंदोलन -:
राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत वाहन धारकांकडून कोणताही टोल वसूल केला जाऊ नये यासाठी किमान ५०% तरी टोलमाफी दिली जावी तसेच स्थानिकांना संपूर्ण टोलमाफी साठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण जवळपास ५ ते ६ तास तासवडे टोलनाक्यावर ठिय्या मांडून होते.

 

Advertisement

error: Content is protected !!