औषधाच्या नावाखाली मद्याची(दारू) तस्करी ; राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाच्या डॉ. उमा पाटील व त्यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई ; 87 लाख रुपयांच्या माल जप्त
कराड : तालुक्यातील लोहारवाडी हद्दीत राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाच्या पथकाने औषधाच्या नावाखाली गोवा बनावटीची दारू तस्करी करणारा पुण्याच्या दिशेने चाललेल्या ट्रक पकडला. यामध्ये सुमारे 87 लाख रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जप्त करण्यात आला. या संदर्भात माहिती देण्यासाठी आज राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प अधीक्षक वैभव वैद्य यांनी कराड येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेस राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाचे सहाय्यक निरीक्षक डॉ. उमा पाटील ह्या उपस्थित होत्या.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की राम बनवारी वय 33 रा. हरि राम गोदारा, नानु जोधपूर, राजस्थान असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. हा ट्रक चालक पुण्याच्या दिशेने ट्रक घेऊन जात असताना राज्य उत्पादन शुल्क कराड विभागचे सहाय्यक निरीक्षक यांनी डॉ. उमा पाटील व त्यांच्या पथकाला शंका आल्याने सदर ट्रकची तपासणी केली. यामध्ये ट्रकच्या दर्शनी बाजूला असलेल्या बॉक्समध्ये औषधे ठेवलेली होती व आतील बाजूस ठेवलेल्या रॉयल ब्लू माल्ट या कंपनीच्या 750 मिलीच्या 15000 सीलबंद बाटल्या साधारण 1250 बॉक्सेस मध्ये ठेवल्याचे आढळून आले. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (अ) (इ) 80, 83, 108 अन्वये अटक आली आहे. जिल्ह्यामध्ये बनावट दारू तसेच हातभट्टी दारू निर्मिती विक्री व वाहतूक तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या दारूची निर्मिती विक्री व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास त्याची माहिती या कार्यालयात तात्काळ देण्यात यावी असे आव्हानही अधीक्षक वैभव वैद्य यांनी केले आहे. सदरची कारवाई आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई डॉ. विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे, विजय चिंचाळकर विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Add Comment