आपला कराड

पत्रकार विद्या मोरे ‘लायन्स इंटरनॅशनल मल्टिपल’च्या ‘हिरो डिस्ट्रिक्ट अवॉर्ड’ने सन्मानित

कराड : लायन्स क्लब नक्षत्रच्या माजी अध्यक्षा आणि रिजन कॅबिनेट कोऑर्डिनेटर (GMT) सौ. विद्या मोरे यांना लायन्स इंटरनॅशनल मल्टिपलच्या वतीने “हिरो डिस्ट्रिक्ट अवॉर्ड”ने नुकताच सन्मानित करण्यात आले. नाशिक येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहून उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल सौ. मोरे यांची निवड करण्यात आली होती. या कार्यक्रमात संपूर्ण राज्यभरातून सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना सौ. विद्या मोरे म्हणाल्या, “माझा सामाजिक कार्यामध्ये नेहमीच उत्साह राहिला आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात मी सक्रिय राहते. या कार्याची दखल घेत आजवर मला 36 पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. मात्र आजचा हा ‘हिरो डिस्ट्रिक्ट अवॉर्ड’ माझ्यासाठी विशेष सन्मान आहे. हा सन्मान मला अधिक जोमाने कार्य करण्यासाठी प्रेरणा देईल.”

या पुरस्कार सोहळ्यात PID संतोषकुमार चौहान, MCC सुनील देसरदा व सौ. देसरदा, मल्टीपल सेक्रेटरी बलबीरसिंग विज, MVCC भोजराज नाईक निंबाळकर, GMT MD 3234 जगदीश पुरोहित, PID डॉ. नवल मालू, PID प्रेमचंद बाफना, कन्वेंशन अध्यक्ष पीडीजी राजेश राऊत, D1 चे डीजी एम.के. पाटील, H2 चे डीजी गिरीश सिसोदिया, H1 चे डीजी डॉ. रिपल राणे आणि D2 चे डीजी विजय सारदा आदी मान्यवर उपस्थित होते.

सौ. मोरे यांचे या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

Featured

Advertisement

error: Content is protected !!