पश्चिम महराष्ट्रातील आजवरची सर्वात मोठी कारवाई ; अमोल ठाकूर यांच्या ‘ड्रग्ज फ्री’ कराडचे द़ृष्टीने मोठे पाऊल
कराडचे उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांनी कराडमधील तरुण पिढी ही व्यसनाधीन झालेली आहे. ‘एमडी’ सारखे अत्यंत महागडे आणि घातक असे अमली पदार्थ देखील कराडमध्ये उपलब्ध होत असल्याचे व कराडमधील सुजान नागरिकांकडून वारंवार होणार्या तक्रारींमुळे अमोल ठाकूर यांनी कराड हे ‘नशामुक्त’ करण्याचा जणू विडाच उचलला होता. त्यादृष्टीने डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी ‘कराड रन’ सारखे स्पर्धात्मक उपक्रम राबवून नागरिकांना ‘नशामुक्त कराड’चे संदेश आणि हाक कराडकरांना दिली होती. अलीकडील काळात कराडमध्ये अनेक ठिकाणी या अमली पदार्थांविरोधात कारवाया करणेत आले. सदर केलेली ही कारवाई कराड किंबहूना पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई असल्याची बोलले जात आहे. याबद्दल डीवायएसपी अमोल ठाकूर आणि पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख असतील किंवा डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्याकडे या अंमली पदार्थ नशेत धुंद असलेली कराडमधील तरुणपिढी किंवा तस्करीच्या बाबतीत ‘यशवंत विचार’ व ‘स्पॉट न्यूज’तर्फे अनेकवेळा मत व्यक्त करण्यात आले होते.
कराड : तासवडे ता. कराड एम आय डी सीतील शेतीचे खते बनवण्याचा निर्मिती करण्याच्या दाखवून प्रत्यक्षात ‘एमडी’ सारख्या ड्रग्ज ‘डीलींग’ करणार्या सुर्यप्रभा फॉर्मकेन कंपनीतून तब्बल ६ कोटी ३५ लाखांचे ‘कोकेन’ तळबीड पोलीसांनी जप्त केले आहे. शुक्रवार २३ मे रोजी ही घटना उघडकीस आली. या झालेल्या कारवाईबद्दल अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली होती. सदर केलेल्या कारवाईमध्ये जवळपास १३०० गॅ्रम कोकेन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी कंपनीच्या मालकासह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनी मालक अमरसिंह जयवंत देशमुख (रा. नांदगांव सातारा) समीर सुधाकर पडवळ (रा. वृंदावनसिटी (मलकापूर) कराड) रमेश शंकर पाटील (रा. मल्हारपेठ) जीवन चंद्रकांत चव्हाण (रा. आवार्डे, ता. पाटण) व विश्वनाथ शिपणकर (रा. दौंड, जि. पूणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. अंमली औषधी द्रव्य अधिनियम १९८५ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर सुधाकर पडवळ, जीवन चंद्रकांत चव्हाण, रमेश शंकर पाटील यांना अटक करण्यात आली आहे. तर कंपनी मालक अमरसिंह देशमुख व विश्वनाथ शिपणकर हे फरार आहेत.
मौजे तासवडे ता. कराड गावचे हददीतील तासवडे एम. आय. डी. सी. परिसरातील केमीकल कारखान्यावर कारवाई करुन ६,३५,००,०००/- रुपये किंमतीचा १.२७० कि. ग्रॅ. वजनाचे कोकेन जप्त सातारा जिल्हा पोलीस दलामध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहिम प्रभाविपणे राबविणेबाबत पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी यांच्या सुचनेनुसार कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकुर यांनी त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे पथक तयार करुन ही कारवाई केली.
सविस्तर माहिती अशी की, पोलीस निरीक्षक श्री. किरण भोसले यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, तासवडे ता. कराड गावचे हददीतील तासवडे एम. आय. डी. सी. मधील सुर्यप्रभा फॉर्माकेम या कंपनीमध्ये अंमली पदार्थाची साठवणूक व निर्मिती होत आहे. डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या आदेशाने सपोनि किरण भोसले यांचे अधिपत्याखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कराड व तळबीड पोलीस ठाणेचे संयुक्त पथकाने छापा कारवाई करुन कंपनीत एकुण १.२७० कि. ग्रॅ. वजनाचे ६,३५,००,०००/- रुपये किंमतीचा कोकेन हा अंमली पदार्थ फॉरेन्सिक सपोर्ट टिमचे मदतीने ताब्यात घेवून जप्त करणेत आलेला आहे. सदर घटनेबाबत पोलीस कॉन्स्टेबल अभय मोरे यांनी सरकारतर्फे तळबीड पोलीस ठाणेस तक्रार दिली असून गुन्हा दाखल करणेत आला आहे. गुन्हयाची व्याप्ती गांर्भीय लक्षात घेता विशेष तपास पथक गठीत करणेत आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर उस. पो. नि. किरण भोसले, अमीत बाबर, पोलीस उप निरीक्षक साक्षात्कार पाटील, सतिश आंदेलवार, ग्रेड पोउनि श्री. काळे, स. फौ. शशिकांत खराडे, पोलीस हवालदार शहाजी पाटील, योगेश भोसले, आंनदा रजपूत, गोरखनाथ सांळुखे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश विभुते, अभय मोरे, सुंशात कुंभार, महेश शिंदे, प्रविण गायकवाड, गणेश राठोड, ऋषिकेश वेल्हाळ महिला पोलीस अंमलदार विनया वाघमारे, रत्ना कुंभार, शितल मोहिते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील स. फौ. संतोष सपाटे, दिनेश घाडगे, पोलीस हवालदार असिफ जमादार, संताजी जाधव, प्रशात चव्हाण, प्रविण पवार, पोलीस नाईक सागर बर्गे, दिपक कोळी, पोलीस कॉन्स्टेबल मयुर देशमुख, अनिकेत पवार, वैभव पवार, सुरज चिंचकर, अमोल फल्ले, राजाराम बाबर तसेच फॉरेन्सिक विभागाचे पोलीस हवालदार प्रशात ताटे, दिनानाथ जाधव तसेच इंटरशिप करणारे प्रशिक्षणार्थी शंभुराज सांळुखे व आदित्य लोंढे सायबर पोलीस ठाणेचे पोलीस कॉन्स्टेबल रणजित कुंभार, प्रशात मोरे, ओकांर डुबल, सुशांत घाडगे यांनी केलेली आहे.

Add Comment