Front

२४ तास अविरतपणे कार्यरत असणार्‍या साबीरमियाँचा अनपेक्षित असा सुखद धक्का देणारा झालेला सन्मान…

एका खाजगी शाळेच्या अंतरराज्य असलेल्या स्पर्धात्मक कार्यक्रमात… अन् त्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहूणा नाही का संयोजक नसलेला… फक्त एका चांगल्या उपक्रमाला साथ देणे, दाद देणे या उदात्त व स्वच्छ हेतूने एक सामान्य प्रेक्षक म्हणून पाहोचलेल्या साबीरमियाँ उस्मानगणी मुल्ला या नावाचा… अनपेक्षित असा झालेला सन्मान… साबीरमियाँ असो, त्याचे कुटुंबीय, त्याचे नातेवाईक, त्याचे मित्रमंडळी असो की त्याचे सहकारी असो की त्याचे कार्यकर्ते असो मनाला सुखावणारा… क्षणभरासाठी सुन्न करणारा… त्याच्या कार्याची… त्याच्या संघर्षाची… त्याच्या कष्टाची पोहोच पावती देणारा असा तो क्षण खरचं आमच्यासारख्या त्याच्या सहकार्‍यांनाही सुखाचा धक्का देणारा असाच तो क्षण…

साफ और खुलूस नियत से किए गए काम की तारीफ तो उपरवाला करता है (शब्दश: स्वच्छ आणि चांगल्या नितीने केलेल्या कामाची स्तुती तर परमेश्वर करतो) ५ वर्ष होत आली या संपूर्ण पृथ्वी तलावर भस्मासुराप्रमाणे एक मोठं संकट मानवजातीवर ओढवलं होतं… कोरोना… आजही आठवण झाली की अंगावर शहारे येतात…मानवाला मानवापासून दुरावणारा… अस्पर्श…संपर्कहीन…दुरावणारा हा महाभयंकर असलेल्या कोरोनाच्या आजाराने अगदी लोकांच्या जगण्याची व्याख्याच बदलली… घरचा जरी या आजाराने मृत्यूमुखी पडला तरी त्याचे न दर्शन… न कोणताही स्पर्श… न कसल्याही प्रकारचा शेवटचा निरोप… अशा महाभयानक परिस्थितीत… काही ठराविक बोटांवर मोजण्याइतके आपल्या जीवाची पर्वा न करता देवदूतासारखे काम करणारे लोक… त्यामध्ये फक्त कराडच काय तर संपूर्ण राज्यभर एक नाव नावरुपाला आले ते म्हणजे साबीरमियाँ…
असे म्हणतात की मुलांमध्ये एक का होईना आपल्या आई-वडीलांचे गुण येतात… त्याला साबीरमियाँ देखील अपवाद ठरला नाही… आपल्या आई आणि वडीलांचे एक गुण साबीरमियाँच्या अंगी आले ते म्हणजे ईस्लाम धर्मात मुस्लिम समाजामध्ये एखादी मुस्लिम व्यक्ती मृत्यूमुखी झाली की त्याचे अंत्यविधी हा ईस्लाम धर्माच्या विधीवत केला जातो… गेले अनेक वर्षांपासून साबीरमियाँ वडील उस्मानगणी मुल्ला आणि त्यांच्या मातोश्री बतुल उस्मानगणी मुल्ला अगदी बिनदिक्कतपणे करत होते….आहेत… या पृथ्वी तलावरील मग ते कोणतेही जात धर्म असो सर्वात अवघड कोणते काम असेल तर एका मृत व्यक्तीचे शेवटचे विधी धार्मिक तत्वानुसार पूर्ण करणे. त्यामुळे हे काम करणेसाठी चांगले-चांगले लोकं पुढे येण्याचे धाडस करत नाहीत. मात्र हाच एक गुण अगदी लहानपणापासून आपल्या आई वडीलांचे पाहत आलेला हा गुण साबीरमियाँने अंगीकारले… वयाच्या १४-१५ पासून आजतागायत हे पूण्याईचे कर्म अविरतपणे सुरु आहे…
एक आठवण म्हणून सांगावेसे वाटते काही वर्षांपूर्वी… कर्नाटक स्थित आणि उदरनिर्वाहसाठी गुजरात येथे राहत असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला… त्या मृत व्यक्तीस त्याच्या मूळगावी दफन व्हावा यासाठी गुजरात सरकार त्याचे मृतदेह त्याच्या मूळगावी नेण्यासाठी परवानगी दिली (कोरोना काळ होता…) गुजरात मधून निघालेले त्या व्यक्तीचे मृतदेह… गुजरात अहमदाबाद प्रवास करत मुंबई व्हाया पूणे कोल्हपूर ते कर्नाटकमधील मूळगावी नेण्यासाठी रुग्णवाहीकेने कर्नाटकच्या सीमारेषेपर्यंत पोहोचले खरे मात्र कर्नाटक सरकारने त्याचा त्या मृतहेास परवानगी नाकारली… कोल्हापूर व सांगलीच्या लोकांनी त्यास दफन करण्यास नकार दिले. अशावेळी रात्री ११ च्या सुमारास (रमजानचा महिना… महिनाभर उपवासाचे दिवस…) एक फोन आला आणि साबीरमियाँ विनंती करण्यात आली… आणि रमजानच्या उपवासाच्या या कालावधीत मध्यरात्री ३ च्या सुमारास अखेर त्या मृतदेहास अखेरच्या प्रवासासाठी कराड येथे जागा मिळाली… साबीरमियाँ दोन जबाबदारी एकतर हे अंत्यविधीचे कार्य आणि दुसरे कराडच्या शाही कब्रस्तान ट्रस्टचा विश्वस्त आहे. यशवंत विचारच्या माध्यमातून याची बातमी प्रसिध्द केली होती…
१४ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२ च्या सुमारास ज्यावेळी त्या शाळेचे शिक्षक सैफ सय्यद सर साबीरमियाँच्या कार्याबद्दल लोकांना सांगत होते… त्यावेळी समोर बसलेले विद्यार्थी, प्रेक्षक अगदी सुई पडल्याचाही आवाज येईल अशा शांततेत ऐकत होते… फक्त ऐकत नव्हते तर त्या सभागृहातील प्रत्येक व्यक्ती ते शब्द फक्त ऐकत नव्हते तर ते शब्द अनुभवत होते… कारण सभागृहातील हरएक व्यक्तीने साबीरमियाँच्या कार्याचा… व्यक्तिश: अनुभव घेतला आहे…
साबीरमियाँ फक्त अंत्यविधीचेच काम नाही करत तर… समाजातील सामान्याच्या माणसांच्या अडीअडचणीत अविरतपणे २४ तास कार्यरत आहे…

मुश्किलोंसे भाग जाना आसान होता है | हर पहलू जिंदगी का ईम्तिहान होता है ॥

डरनवालों को मिलता नही कुछ जिंदगीमे | लढनेवालों के कदमोंमे जहान होता है ॥

२४ तास कार्यरत असणार्‍या साबीरमियाँ बतुल उस्मानगणी मुल्ला यांचा झालेला हा सन्मान खरंच अविस्मरणीय आणि सुखद धक्का……….

 

About the author

मुख्य संपादक : वसीम सय्यद

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

error: Content is protected !!