Front

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 15 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत

सातारा : तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात, शिक्षण संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब  आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभासाठी 15 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले.

तालुकास्तरीय 2024-2025 या वर्षातील नव्याने प्रवेशित व मागील वर्षी स्वाधार योजनेसाठी अर्ज केलेल्या रिनिवल विद्यार्थ्यांनीसुद्धा स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी 15 जानेवारी पर्यंत https://hmas.mahait.org ऑनलाईन अर्ज करावेत. सर्व कागदपत्रासंह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुक्यातील मुला, मुलींचे शासकीय विश्रामगृह येथे सादर करावेत.

 

About the author

मुख्य संपादक : वसीम सय्यद

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

error: Content is protected !!