आपला कराड

कराड अर्बन बँकेला बेस्ट टर्नअराऊंड बँक पुरस्कार

कराड : बँकोच्या वतीने सहकार क्षेत्रातील उत्तम कामगिरी तसेच सुपरवायझरी अ‍ॅशन फ्रेमवर्क या रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ज्या बँकांनी बदलत्या नियमांचे पालन करीत आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा केली आहे, अशा बँकांना पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा पुरस्कार दि. कराड अर्बन बँकेला बेस्ट टर्नअराऊंड बँक म्हणून जाहीर
झाला. बँकेच्या १०८ वर्षाच्या वाटचालीत या पुरस्कारामुळे आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला. बँकोच्यावतीने अ‍ॅम्बे व्हॅली, लोणावळा येथे बँको ब्लू रीबन २०२४ या कार्यक्रमात सदरचा पुरस्कार बँकेला
देण्यात आला. बँकेच्या भ क्कम आर्थिक स्थितीमुळे रिझर्व्ह बँकेने मोबाईल बँकिंग, यूपीआय सेवेला परवानगी दिली. तसेच डिसेंबर २०२४ मध्ये नवीन शाखांना परवानगी मिळण्यासाठीचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे सादर केला होता या
प्रस्तावास एका महिन्यात सकारात्मक प्रतिसाद देत रिझर्व्ह बँकेने हडपसर जि. पुणे, चाकण जि. पुणे, शिरवळ जि. सातारा, इचलकरंजी जि. कोल्हापूर, नातेपुते जि. सोलापूर अशा नवीन पाच शाखांना सुद्धा परवानगी मिळाली आहे. त्या येत्या काळात लवकरच कार्यान्वित होतील. Banko Blue Ribbon 2024 2024 – Best Turnaround Bank हा पुरस्कार स्विकारण्यासाठी बँकेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सी. ए. दिलीप गुरव, ट्रेझरी विभागाचे महाव्यवस्थापक सलीम शेख, कर्ज विभागाचे
महाव्यवस्थापक गिरीश सिंहासने, हिशेब विभागाचे महाव्यवस्थापक सीए धनंजय शिंगटे, उपमहाव्यवस्थापक अतुल शिंदे, सहाय्यक महाव्यवस्थापक संतोष गायकवाड आणि व्यवस्थापक संदीप पवार उपस्थित होते. दि. कराड अर्बन को -ऑपरेटिव्ह बँकेस Banko Blue Ribbon 2024 – Best Turnaround Bank हा पुरस्कार मिळाल्याबद्दल बँकेचे सभासद व ग्राहक यांनी बँकेचे ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी व मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांचे विविध माध्यमांद्वारे अभिनंदन व कौतुक केले.

 

Featured

Advertisement

error: Content is protected !!