आपला कराड

मुख्याधिकारी विरोधात २ हजार पालकांसह मोर्चा काढणार

माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा इशारा ; शाळा क्रमांक तीनच्या विकासाकडे दुर्लक्ष

कराड : कराड नगरपरिषद शाळा क्रमांक तीनच्या विकासाकडे मुख्याधिकारी शंकर खंदारे हे जाणीवपूर्वक व राजकारण आणून दुर्लक्ष करत आहेत. शाळेच्या मागण्यांची सात दिवसांत पूर्तता न केल्यास
शाळेच्या २ हजार विद्यार्थी, पालक व नागरिकांचा नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा यशवंत विकास आघाडी व शिवसेनेचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन राजेंद्रसिंह यादव यांनी मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की,
कराड नगरपरिषद शाळा क्रमांक ३ ही गुणवत्ता व पटसंख्येत राज्यात अग्रेसर असून शाळेचा गुणगौरव देशपातळीवर झाला आहे. ही कराडच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. मात्र सध्या या शाळेकडे मुख्याधिकारी तथा प्रशासक जाणूनबुजून दुलेक्ष करीत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. यामध्ये ते राजकारण करीत असल्याची आमची खात्री झाली आहे.

शाळा क्रमांक ३ च्या रविवार पेठेतील ३ वर्ग खोल्यांचे काम गेली १८ महिने आपण मुद्दाम सुरु केले नाही. त्यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. शाळा रंगरंगोटी, मुतार्या, स्वच्छता, ड्रेनेजचे काम केले नाही. यामुळे मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

याउलट ज्या शाळेत विद्यार्थी नाहीत, अश्या शाळांना भौतिक सुविधा रंगरंगोटी करुन दिली आहे. यावरुन आपण कोणाच्या तरी सांगण्यावरुन हे सर्व करीत असल्याचे दिसून येते. शाळा क्र 3 मध्ये २ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात, मात्र तेथे मुद्दाम शिक्षक न देणे. “समन्वयक’ पदाची नेमणूक न करणे हे जाणीवपर्वक केले जात आह,

या सर्व गोष्टीमुळे शाळेच्या गुणवत्तेवर व पटसंख्येवर परिणाम होत आहे. महाराष्ट्रातील नावाजलेल्या नगरपालिकेच्या शाळेला सहकार्य न करण्याची भुमिका चुकीची आहे. या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवरही आम्ही तक्रार करणार आहोत. वरील सर्व बाबी ७ दिवसात पुर्ण न केल्यास आपल्या कार्यालयावर २ हजार विद्यार्थी, पालक, व प्रभागातील नागरिकांचा नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल व या गोष्टीस सर्वस्वी तुम्ही जबाबदार राहाल, असा इशारा यशवंत विकास आघाडीचे नेते व, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी दिला आहे.

 

Featured

Advertisement

error: Content is protected !!