पृथ्वीराज बाबांनी हद्दवाढ भागासाठी दिलेले 16 कोटी रुपये दुसऱ्या कामासाठी वापरले
कराड : नगरपालिकेत पाच वर्षे सत्ता हातात असताना भाजपने कोणतेही विकास काम केले नाही भाजपने नगरपालिका निवडणुकीत शब्द नावाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यामधील एकही विकासकाम केले नसल्याने त्यांच्याच आवाहन नुसार भाजप उमेदवाराला मते मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. भाजपने पाच वर्ष सत्ता भोगली मात्र विकास कामे काहीच केलेली नाहीत. हे कशाच्या आधारे सांगत आहोत तर कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान भाजप कडून व अतुल भोसले यांच्याकडून जो ‘शब्द’ नावाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला गेला होता. त्याची कोणतीही अंमलबजावणी केली नाही. पाच वर्षे भाजपची सत्ता असून सुद्धा कोणतीही विकासकामे कराड शहरात केली गेली नाहीत. त्यामुळे त्यांनीच निवडणुकीच्या काळात दिलेला शब्द नामाप्रमाणे विकास तू केला नाही शब्दही पाळला नाही, *त्याच शब्दनाम्यात विकास केला नाही तर मत मागायला येणार नाही असे आश्वासन* देणारे भाजपचे उमेदवार विधानसभेला मात्र लोकांपुढे मत मागण्यासाठी जात आहेत, कराडकरांना दिलेला शब्द च ज्यांनी पाळला नाही त्यांना कोणताही कराडकरांकडे मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही. असा घणाघाती आरोप प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी करत भाजपच्या पालिकेमधील पाच वर्षाचा कारभार संशयास्पद असल्यामुळे त्याचेही चौकशीचा इशारा देत त्या विरोधात विधानसभेनंतर आक्रमक पवित्र घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्री मोरे म्हणाले कराड नगरपालिकेच्या 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपने आम्ही शब्द देतो म्हणून लोकांना कराडच्या विकासाचे आश्वासन दिले होते मात्र त्या पाच वर्षांमध्ये त्या शब्दनाम्यामधला एकही शब्द भाजपच्या नेत्यांना पूर्ण करता आलेला नाही. २०१६ मध्ये कराडकरांनी विश्वासाने भाजपला सत्ता मिळवून दिली होती परंतु कराडकरांचा त्यांनी भ्रमनिरास केला. यामुळेच कराडकर जनता यावेळी अशा आश्वासनांची कोणतीही पूर्तता न केलेल्या तसेच कराडकरांची दिशाभूल केलेल्या उमेदवाराला कदापि साथ देणार नाही.
भाजपने कृष्णामाई घाटाची सुशोभीकरणाचा शब्द दिला होता तो कृष्णा घाट अद्यापही सुशोभीकरणाच्या प्रतिक्षेत आहे. शहरामध्ये नवीन बाग बगीचे करण्याचा शब्द दिला होता मात्र एकही बाग विकसित केली गेली नाही. पाच वर्षात झाला नाही कराडची नगरपालिका स्मार्ट होणार असे जाहीर केले होते मात्र ती नगरपालिका ही अद्यापही जुन्याच रेकॉर्डवर चालते कराड शहरातील स्वामींची बाग विकसित करणार म्हणून आश्वासन दिले होते परंतु तीही दुर्लक्षित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभा करणार होता परंतु त्यामध्ये सुद्धा काहीच केले गेले नाही. ऐतिहासिक मनोरे दुर्लक्षित राहिले आहे त्याचीही सुशोभीकरणाचा शब्द त्यांनी पाळला नाही.
श्री मोरे म्हणाले भाजप सातत्याने पाटण कॉलनीतल्या झोपडपट्टीधारकांचा विषय काढून पृथ्वीराज चव्हाण म्हणून निशाणा साधत आहे मात्र ते लोकांची दिशाभूल करत आहेत. भाजपने 2016 साली पालिकेच्या निवडणुकीमध्ये शब्द नामा दिला होता त्यामध्ये शहरातल्या प्रत्येक झोपडपट्टी धारकाला पक्की घरे देण्याचा शब्द दिला होता तो त्यांनी पाळला नाही. आपण दिलेला शब्द विसरायचा आणि दुसऱ्याकडे बोट दाखवायचा ही प्रवृत्ती भाजपची असल्यामुळे ते अगदी सर्रास कराडमधील नागरिकांची दिशाभूल करत आहेत. पाच वर्षात प्रत्येक झोपडपट्टी धारकाला घर देणार असे आश्वासन दिले गेले होते, पण ते आश्वासन सोडून पुन्हा नवीन तेच आश्वासन घेऊन भाजपचे उमेदवार कराडकरांची दिशाभूल करायला आले आहेत. भाजप केवळ राजकारण करण्यासाठी एकाच पाटण कॉलनीतील झोपडपट्टी धारकांचा विषयी समोर काढत आहे पाच वर्षांपूर्वी तुम्ही पालिकेच्या शाळांना डिजिटल क्लासरूम देण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले होते तोही शब्द तुमचा पाळला नाही मुलांसाठी खेळणी देणे पालकांच्या शाळा दर्जा सुधारणे या सगळ्या गोष्टी तुम्ही सोयीस्कर पदे विधानसभेच्या निवडणुकीत विसरत आहात हे सामान्य जनतेच्या लक्षात आले आहे त्यामुळे पृथ्वीराज बाबांवर होणारे आरोप हे केवळ राजकारण आहे हे सामान्यांच्या लक्षात आले आहे.
श्री मोरे म्हणले, शहरामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याचा भाजपने शब्द दिला होता मात्र एकही तसे अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारले गेले नाही याउलट उभारली गेलेली स्वच्छतागृह यांनी पाडली
नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणार होते तेही काम झाले नाही चोवीस बाय सात ही पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत
याउलट ही योजनाच आता चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे त्यामुळे शुद्ध पाणी देण्यात पाच वर्षात नगरपालिकेला पर्यायने भाजपला अपयश आले आहे शहराला स्ट्रीट लाईट देणे त्याचे सुशोभीकरण करणे अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करणे या गोष्टीही भाजपला पूर्ण करता आले नाहीत
श्री मोरे म्हणाले कराड नगरपालिकेवर भाजपची सत्ता असतानाही पाच वर्षात त्यांना काही काम करता आले नाही आणि आता तेच भाजप व त्यांचे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहे. शहराच्या हद्द वाढीसाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन टप्प्यांमध्ये सोळा कोटींचा निधी दिला मात्र याच भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी तो निधी परस्पर दुसऱ्या कामाकडे वळवला कराडचा जुना कोयना पूल पृथ्वीराज चव्हाण यांनी सक्षम केला त्यामुळे महामार्गाचे काम सुरू असताना कराड करांची वाहतुकीच्या कोंडीतून सुटका झाली. अशी अनेक कामे कराडकरांच्या सोयीची पृथ्वीराज बाबानी पूर्ण केली आहेत व हे कराडकर जाणून आहेत.
Add Comment