259 कराड उत्तर मतदार संघातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल
कराड – : कराड उत्तरमध्ये गेले 10 वर्षांपासून रोजगार निर्मिती झालेली नाही. कराड उत्तरमधील अनेक तरुण हे उदरनिर्वाहासाठी पूणे, मुंबई सारख्या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. कराड उत्तरमधील तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी या मतदारसंघातून आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती अजय सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
259 कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून अजय सूर्यवंशी यांच्या माध्यमातून पहिलाच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्थापितांची हुकूमशाही सुरू आहे. ती हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी, तसेच मतदारसंघातील गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि शैक्षणिक संस्थांच्या उन्नतीसाठी
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून अजय सूर्यवंशी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या अजय सूर्यवंशी यांना सर्व सममन्यांच्या प्रश्नांची जाण आहे. गेले दहा वर्ष कराड उत्तरमध्ये काम करत असताना अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आम्ही केले असल्याची माहिती अजय सूर्यवंशी यांनी दिली. मतदारसंघातील अनेक नागरिकांना अद्याप घरकुल मिळाले नसून अनेक समस्याना कराड उत्तर मतदारसंघातील सामान्य नागरिक तोंड देत प्रलंबित रस्त्यांची कामे, शैक्षणिक संस्थांची उभारणी आणि मतदारसंघातील युवकांच्या हाताला काम देण्यासाठी बेरोजगारी निर्मूलन करण्यासाठी म्हणून होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक 2024 च्या मैदानात अजय सूर्यवंशी यांनी शड्डू ठोकला आहे.
अजय सूर्यवंशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
Add Comment