राज्य

आ. पृथ्वीराज चव्हाण बाबा सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

कराड दि. 27 : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवार, दि. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कराड येथील निवडणुक अधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दिपावली सणाच्या अनुषंगाने व्यापारी व खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोय होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांच्या मागणीचा विचार करून शक्तीप्रदर्शन न करता मागच्या वेळी सारखेच यावेळी सुद्धा अत्यंत साध्या पद्धतीने आ. पृथ्वीराज चव्हाण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तरी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले आहे.

 

About the author

मुख्य संपादक : वसीम सय्यद

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

error: Content is protected !!