कराड : महावितरण कंपनीच्या वर्धापन दिन व विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त कराड येथे 6 जुन रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 7 वाजता महावितरणच्या दत्त चौक येथील कार्यालय येथून ते कृष्णामाई घाट पर्यंत या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. लोकांमध्ये विद्युत सुरक्षेचे महत्व कळावे व विद्युतमुळे होणारे अपघात टाळता यावे या हेतूने या मॅरेथॉनचे आयोजन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कराड विभागतर्फे करण्यात आले आहे. या मॅरेथॉन मध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणारया स्पर्धकास पदक देण्यात येणार आहे.

Add Comment