राज्य

पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सायली कुलकर्णी ; तर प्रसिद्धी प्रमुखपदी युनूस खतीब यांची नियुक्ती

प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार युनूस खतीब यांची सन २०२४ ते २०२५ दुसऱ्यांदा नियुक्ती

पिंपरी चिंचवड : १७ ऑक्टोंबर २०२४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सायली कुलकर्णी तर प्रसिद्धी प्रमुख पदी युनूस खतीब यांची नियुक्ती करण्यात आली.

अखिल भारतीय मराठी पत्रकार संस्था ( रजि.) या संस्थेशी संलग्न असलेल्या पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड पुढील एक वर्षासाठी करण्यात आली आहे.

पिंपरी महापालिका मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीस अनेक पत्रकार उपस्थित होते.

सन २०२४ ते २०२५ या वर्षासाठी पुढील प्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

अध्यक्ष – सायली कुलकर्णी,( माझी सखी सोबती)

वरिष्ठ उपाध्यक्ष – बाबू कांबळे ( दैनिक संध्या )

प्रसिध्दी प्रमुख – युनूस खतीब ( पिपंरी चिंचवड सिटी न्यूज)

उपाध्यक्ष – विनय लोंढे
( परिवर्तनाचा सामना )

उपाध्यक्ष – रेहान सय्यद ( शबनम न्यूज)

सेक्रेटरी – संतोष जराड (पीसीएमसी न्यूज)

कोषाध्यक्ष – गणेश शिंदे
(न्यूज २४ महाराष्ट्र )

सदस्य – बापूसाहेब गोरे
( माझा आवाज )

विश्वास शिंदे
( पुणे दर्शन )

अशोक लोखंडे.
(पीसीएमसी न्यूज)

पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाला अनेक वर्षांची परंपरा असून पत्रकार अधिवेशन,पत्रकार कार्यशाळा,दिवाळी फराळ,पत्रकारांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणे असे अनेक उपक्रम पत्रकार संघाच्या माध्यमातून राबविले जातात.

पत्रकार संघाच्या सन २०२४-२५ साठी नूतन कार्यकारिणी निवड झाल्याने पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

 

Featured

Advertisement

error: Content is protected !!