कराड : अण्णाभाऊ साठे यांना 15 ऑगस्टपूर्वी भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी कराड व परिसरातील विविध सामाजिक संघटनांनी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अन्यथा आम्ही स्वातंत्रदिनी आत्मदहन करू असा इशारा दिला होता. याच धर्तीवर आज प्रांत कार्यालय समोर विविध सामाजिक संघटनांनी व त्यांचे पदाधिकारी यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. आत्मदहन करत असतानाच त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली. अटक केलेल्यांमध्ये माजी नगरसेवक आनंदराव लादे, जावेदभाई नायकवडी, सलीम पटेल, नितीन आवळे, वसंतोष वायदंडे, लक्ष्मी काळे, शालन साळुंखे, अर्चना जाधव, रुपाली पुस्तके आदी सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

Add Comment