आपला कराड

डेंग्यू प्रादुर्भाव रोखण्यासाठी कराड नगरपालिकेकडून औषध फवारणी

oplus_131072

कराड : गत काही दिवसांपासून पावसाचे जोर सुरू आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचून राहत असल्याने आणि पावसांमुळे साथीचे रोग पसरत आहेत. यासाठी म्हणून कराड नगरपालिकेकडून औषध फवारणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरात डेंग्यूचे रुग्ण आणि साथीचे रोग वाढत असल्याने खबरदारी म्हणून शहरातील प्रत्येक भागात कराड नगरपालिकेकडून औषध फवारणी करण्यात येत आहे. प्रत्येक प्रभागात दोन दिवस याप्रमाणे शहर परिसरात औषध फवारणी केली जाते. ज्याठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आहेत त्याठिकाणी देखील औषधे फवारणी केली जात आहे. गेले अनेक दिवसांपासून ही औषध फवारणी मोहीम सुरू आहे.

 

Featured

Advertisement

error: Content is protected !!