आपला कराड

९ ऑक्टोबरला भव्य “सैनिक सन्मान रॅली” चे आयोजन – प्रशांत कदम (माजी सैनिक)

कराड : “सैनिक हो तुमच्यासाठी” अमृत वीरजवान अभियान अंतर्गत ले. कर्नल सतेश हंगे (नि.) उपसंचालक सैनिक कल्याण पुणे विभाग व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा यांचा आजी/ माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय शहीद जवान कुटुंबीय व पॅरामिलिटरी फोर्स माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय यांच्या महसूल , पोलीस विभाग व इतर विभागातील समस्या, अडचणीचा निपटारा करने कामी व सैनिक कल्याण विभागाच्या योजनांचे मार्गदर्शन करणेकामी शासन निर्णयानुसार कराड तालुका दौरा होत आहे. या निमीत्ताने आपल्या मातृभूमीसाठी स्वतंत्र मिळवून देण्यासाठी बलिदान देणारे स्वतंत्र सैनिक व भारत देशाच्या सीमेचे रक्षण करताना शहीद झालेले भारतीय सैन्य दलातील, पॅरामिलिटरी फॉर्सेस मधील, महाराष्ट्र पोलीस दलातील या सर्व दलातील शहीद जवान यांच्या स्मृतीला त्यांच्या शौर्याला उजाळा देण्यासाठी “सैनिक सन्मान रॅली बुधवार दि.०९/१०/२०२४ रोजी सकाळी १० वाजता आयोजीत केली आहे या प्रसंगी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
सैनिक सन्मान रॅली प्रीतीसंगम कराड स्व.यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते विजय दिवस चौक येथील विजय स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून तहसील कार्यालय येथे या रॅलीचे सांगता होईल. तद्नंतर कराड तहसील कार्यालय सभागृह येथे सैनिक मेळावा बैठक आयोजित करण्यात आले आहे. या बैठकीला सर्व महसूल, पोलीस विभाग व इतर विभागातील अधिकारी उपस्थित रहाणार आहेत. तरी सर्व आजी/माजी सैनिक संघटना पदाधिकारी व सर्व दलातील आजी-माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय,शहीद जवान कुटुंबीय यांनी या सैनिक सन्मान रॅली व सैनिक मेळावा बैठकिस बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रशांत कदम (माजी सैनिक) यांनी केले आहे.

 

Featured

Advertisement

error: Content is protected !!