कराड : येथील रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरु गाडगे महाराज
महाविद्यालयास रयत शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा डॉ. पतंगराव कदम आदर्श स्वायत्त महाविद्यालय पुरस्कार प्रदान करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेच्या १०५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेमार्फत सद्गुरु गाडगे महाराज स्वायत्त महाविद्यालयास डॉ. पतंगराव कदम आदर्श स्वायत्त महाविद्यालय पुरस्कार रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाचे प्रमुख पाहुणे मा.डॉ. वसंत काळपांडे, शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य तसेच रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. डॉ. चंद्रकांत दळवी, मा. अँड. भगीरथ शिंदे, व्हाईस चेअरमन रयत शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्थेचे संघटक मा.डॉ. अनिल पाटील, लोकनेते रामशेठजी ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे सचिव, विकास देशमुख, सहसचिव, प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, ऑडिटर, प्राचार्य, डॉ. राजेंद्र मोरे यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अँड. रविंद्र पवार (भाऊ), सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा.एस.ए.पाटील, डॉ. जे.बी.थोरात, डॉ.गिरीश कल्याणशेट्टी, डॉ.ए.के.पाटील, प्रा.सुहास गोडसे रजिस्ट्रार डॉ.अरुणकुमार सकटे इत्यादी उपस्थित होते. डॉ. पतंगराव कदम आदर्श स्वायत्त महाविद्यालय पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन राजमाने यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

Add Comment