भाजप एकसंघ करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने प्रयत्न करणे आवश्यक
ओगलेवाडी : यशवंत विचारावर चालणारा आणि तरीही विकासापासून वंचित असणारा मतदारसंघ म्हणून कराड उत्तर या मतदारसंघाची ओळख निर्माण झाली आहे. सलग तीन दशके या मतदारसंघावर वर्चस्व गाजवूनही सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या चीरस्थायी अध्यक्ष पदामुळे श्री .पाटील यांची लोकप्रियता टिकून आहे.ही संस्था केवळ औद्योगिक संस्था नाही तर येथील शेतकऱ्यांची जीवन रेखा ठरलेली आहे. शेतकऱ्यांची उपजीविका कारखान्याच्या भवितव्याशी जोडली गेलेली असल्यामुळे त्यांना कायमच निष्ठावंत मतदारांचा आधार मिळाला आहे. तरीही या मतदार संघाची परिस्थिती बदलण्यात त्यांना अपयश आले आहे.
कृष्णा कोणाचा संगम, मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपलब्धता,एवढे असूनही कराड उत्तर मतदारसंघ विकासापासून कोसो दूर आहे. याचे कारण म्हणजे निष्क्रिय आणि जनहिताची जाण नसलेला लोकप्रतिनिधी हे होय.
ही परिस्थिती बदलण्याची संधी 2024 विधानसभा निवडणुकीत लोकांना उपलब्ध झाली आहे. तरुण आणि मध्यमवर्ग यांच्यामध्ये असलेली प्रचंड नाराजी यश मिळवून देईल याची खात्री आहे. परंतु यासाठी आवश्यक आहे एकसंघ भाजपाची. भाजप एकसंघ झाली तर यशाची पक्की खात्री असलेला हा मतदारसंघ आहे.पक्ष नेतृत्वाने याबाबत वेळीच लक्ष घालून एकसंघ भाजप बनवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
कराड उत्तर मतदार संघ सलग तीस वर्ष एकाच विचारसरणीच्या प्रभावाखाली आहे.त्यामुळे या मतदारसंघात प्रस्थापिता विरोधात नाराजी प्रचंड वाढलेली आहे. रस्ते,पाणी,वीज,औद्योगीकरण,शेत रस्त्यांच्या समस्या,लघु आणि कुटीर उद्योगांना संरक्षण व व्यावसाय निर्मिती या समस्या मागील 40 वर्षापासून जशाच्या तशा असल्याने तरुणांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.कृष्णा कोयनेचा सधन प्रदेश असूनही या प्रदेशातील अनेक तरुण चरितार्थ चालवण्यासाठी मुंबई,पुणे या ठिकाणी नोकरी करत आहेत.तर काहीजण राज्याबाहेरही नोकरीसाठी भटकत आहेत.
ही समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असलेली कटीबद्धता लोकप्रतिनिधीमध्ये नसल्यामुळे लोक नवीन संधीची वाट पाहत आहेत. नवीन संधी निवडताना कराड उत्तरचे मतदार चाणाक्षपणे विचार करीत उमेदवार निवडीची वाट पाहत आहेत. प्रस्थापिता विरोधात या मतदारसंघांमध्ये प्रचंड विरोधाची लाट आहे.परंतु प्रस्थापितांना आव्हान देणाऱ्यांमध्ये आजपर्यंत कधीही एकी झाली नाही. त्यामुळे तीन उमेदवार असल्यास प्रस्थापित विजयी होणारच हे या मतदारसंघाचे सूत्र बनले आहे. एकास एक उमेदवार असल्यास प्रचंड चुरशीची निवडणूक होऊन जय पराजया मधील अंतर दोन हजारापर्यंत खाली येते याचा अनुभव या मतदारसंघाने घेतलेला आहे. विरोधकांमध्ये कधीही एकजूट पाहायला मिळाली नसल्याने प्रस्थापितांना हा मतदारसंघ आज पर्यंत आपल्या वर्चस्वाखाली राखता आला आहे.
विलोधक नेहमी एक संघ राहण्याऐवजी एकमेकांचे प्रभाव कमी करण्यासाठी झगडत आहेत. शरीराने एकत्र परंतु अंतकरणाने विभक्त विरोधक हेच या मतदारसंघातील विजयाचे गमक आहे.आज कराड उत्तर मतदारसंघांमध्ये प्रस्थापितांना आव्हान देण्यासाठी तीन प्रमुख सांभाव्य उमेदवार समोर आले आहेत. रामकृष्ण वेताळ,मनोज घोरपडे, धैर्यशील कदम ही नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट्य लोकांनी ओळखले असल्याने या तिघांचे वेगवेगळे गट या मतदारसंघात कार्यरत आहेत. रामकृष्ण वेताळ हे वैचारिक बांधिलकी आणि नम्रतेसाठी ओळखले जातात. लोकांशी 24×7 कनेक्ट असलेला लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख आहे. तर धैर्यशील कदम यांच्याकडे राजकीय अनुभव आणि संघटनात्मक क्षमता प्रचंड आहे. मनोज घोरपडे यांच्या गतिमान दृष्टीकोनाला व आर्थिक पराक्रमाला तोडच नाही.परंतु हे एकसंघ नसलेले आव्हान प्रतिस्पर्ध्यासमोर टिकू शकणार नाही. यासाठी यांची मोळी बांधणे आवश्यक आहे.
हे नेते वैयक्तिक महत्त्वकांक्षा बाजूला ठेवून पक्ष आणि मतदारसंघाच्या भल्यासाठी सहकार्य करू शकतील का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कराड उत्तरेतील भाजपाचे मतदार एक संघ उमेदवारीसाठी मागणी करीत आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मतदार संघातील यशाचे गमक ओळखून या मतदारसंघांमध्ये लक्ष घालून तिघांची एकत्रित मोठ बांधणे आवश्यक आहे. मतदारसंघांमध्ये विशेषतः विकास आणि प्रगतीसाठी उत्सुक असलेल्या तरुणांमधील बदलाच्या वाढत्या इच्छेचा एक संयुक्त आघाडी फायदा घेऊ शकते. प्रस्थापितांना हटवण्यासाठी करण्यात आलेल्या पूर्वीच्या प्रयत्नामध्ये यश न मिळण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मत विभाजन होय. दीर्घकाळ चाललेल्या मत विभाजन या फॅक्टरला मूठ माती देण्यासाठी भाजप एकसंघ करून विकासासाठी कटिबद्ध,वचनबद्ध असलेला उमेदवार उभा करून आपल्या यशाची शक्यता लक्षात लक्षणीयरीत्या वाढवण्याची संधी पक्ष समोर आहे.
मात्र एकात्मतेचा मार्ग आव्हानांनी भरलेला आहे.वैयक्तिक अहंकार, स्पर्धात्मक स्वारस्ये आणि भिन्न धोरणात्मक दृष्टीकोन हे एकसंघ आघाडीच्या निर्मितीमध्ये अडथळा आणू शकतात. एकमत घडवण्यासाठी या प्रभावशाली व्यक्तींमध्ये मध्यस्थी करण्याचे नाजूक काम पक्ष नेतृत्वासमोर आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने वेळ साधनेही महत्त्वाचे आहे.कारण या मतदारसंघात उमेदवारीबाबत दीर्घ काळापर्यंत अनिश्चितता राहिल्यास प्रस्थापिता विरोधात प्रभावीपणे प्रचार करण्यास कालावधी कमी मिळणार आहे. एकट्या मजबूत उमेदवारामागे भाजप एकजूट करण्यात यश मिळाल्यास पक्षाची प्रतिमा या मतदारसंघांमध्ये उंचवण्यास कालावधी मिळून यश दृष्टीपथात येणार आहे.
कराड उत्तर मध्ये असलेली भाजपा चौरस्त्यात मध्ये उभी आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आ. बाळासाहेब पाटील यांचे दीर्घकाळ चाललेले वर्चस्व संपुष्टात आणण्याची संधी उपलब्ध आहे. हे करीत असताना या मतदारसंघांमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्राचा विचार करून उमेदवार निवडीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. संयुक्त आघाडी निर्माण करण्याची गरज ओळखून वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घातल्यास गुंतागुंतीचे प्रश्न तातडीने सुटून उत्तरेत एक संघ भाजप निर्माण होईल. कराड उत्तर साठी झालेली ही नवी एकजूट नव्या पर्वाची सुरुवात असेल आणि अनेक वर्षाची प्रस्थापितांची सत्ता घालून नव्या राजवटीचा मार्ग मोकळा करण्याची संधी असेल.
Add Comment