आपला कराड

सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात प्रा. दिवाकर दीक्षित यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार समारंभ संपन्न

Oplus_131072

कराड – येथील रयत शिक्षण संस्थेचे, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड मधील इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख प्रा. दिवाकर रघुनाथ दीक्षित यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ गुरुवार दि. २९-८-२०२४ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने उपस्थित होते. या कार्यक्रमास महाविद्याची उपप्राचार्य प्रा. एस. ए. पाटील, प्रा. नेताजी सूर्यवंशी, प्रा. माधुरी कांबळे, प्रा. आर. वाय. पाटील, पर्यवेक्षक प्रा.एस.आर. नांगरे, रजिस्टार डॉ. अरुणकुमार सकटे, सौ. दीक्षितवहिनी दीक्षित सरांचे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट इ. मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा. दिवाकर दीक्षित व सौ. दीक्षित यांचा सेवापुर्ती दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी प्रा. विकास गायकवाड, डॉ. भाग्यश्री पालकर, प्रा. मृणाल दीक्षित, प्रा . बी.डी. मोहिते, प्रा. मुल्ला मॅडम, प्रा. आर. वाय. देशमुख, प्रा. नांद्रेकर सर, प्रा. बी. जे. नलवडे इ. आपली मनोगत व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना प्रा. दिवाकर दीक्षित म्हणाले की, माझ्या नोकरीची सुरुवात सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयातून झाली आहे आणि माझ्या नोकरीचा शेवटही याच महाविद्यालयातून होत आहे. यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. एकूण माजी सेवा ३६ वर्षे झाली असून यापैकी २० वर्षे सेवा ही याच महाविद्यालयात झालेली आहे. मी कराड, मंचर, लोणंद, या ठिकाणी संस्थेमध्ये काम केले आहे माझं संपूर्ण कुटुंबाचे शिक्षण सुद्धा याच महाविद्यालयातून पूर्ण झालेले आहे. त्यामुळे सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय आणि माझा एक ऋण बंद आहे मी अत्यंत समाधानी आहे. आणि समाधान पणाने सेवानिवृत्त होत आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन राजमाने म्हणाले की, प्रा. दिवाकर दिक्षित हे नियत व विमानानुसार ३६ वर्षे सेवा करून हा ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी संस्थेच्या कराड, मंचर, लोणंद, या शाखेमध्ये काम केलेले आहे. एक विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, मितभाषी प्राध्यापक त्यांच्या कामाबद्दल मी अत्यंत समाधानी आहे. त्यांची कौटुंबिक परिस्थिती सुद्धा फार उत्तम आहे त्यांच्या दोन्ही मुली उच्च विद्याविभूषित आहेत एक डॉक्टर आहे तर दुसरी प्राध्यापिका आहे याबाबतीत ते अत्यंत समाधानी आहेत. त्यांच्याबरोबर पुढील आयुष्यासाठी मी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत व महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एस.ए. पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. सचिन जाधव यांनी मांनले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. कोमल कुंदप व प्रा.डॉ. प्राजक्ता निकम यांनी केले.

 

About the author

मुख्य संपादक : वसीम सय्यद

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

error: Content is protected !!