आपला कराड

स्वतंत्रता दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना दूध वाटप : युवा नेते उमरफारूक सय्यद यांचे स्तुत्य उपक्रम

Oplus_131072

कराड (गोटे) : येथील युवा नेते उमरफारूक सय्यद यांच्यावतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गोटे येथे ध्वजारोहणासाठी उपस्थित असलेल्या शालेय विदयार्थी व गावातील ग्रामस्थांना मसाले दुध वाटप करुन त्यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. नेहमीच सर्व धर्म समभाव ही भावना जपत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने ते समाजकार्य करत राहतात, रक्तदान शिबिर, आधार कार्ड कॅम्प, मतदान नोंदणी शिबिर, यासारखे सामाजिक उपक्रम राबवून नेहमीच गरजू व गोरगरीब जनतेला ते मदत करत असतात,
उमरफारूक सय्यद हे मदनी चॅरिटेबल ट्रस्ट कराड तालुक्याचे अध्यक्ष व राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्यांक कराड दक्षिणचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे, त्यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे योगदान आहे,
नेहमीच आपल्या सामाजिक कार्यातून सर्वसामान्य जनतेचा फायदा कसा होईल याचा विचार करून विविध उपक्रम राबवणारे उमर सय्यद यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे,
यावेळी उपस्थित ग्रामसेवक श्री मुल्ला, सरपंच वहिदा शेख, माजी सरपंच सौ. बानुबी सय्यद, सौ.रईसा देसाई, ग्रामपंचायत सदस्य सौ.नौशादबी पटेल, तांबे मॅडम, राहुल पुजारी, तोफिक आगा, सुधीर पवार ,शब्बीर सय्यद, शकूर सय्यद, हा.रज्जाक पटेल, ताहेरभाई आगा, हा. अल्लाउद्दीन देसाई,जमीर सय्यद, आसिफ शेख, ज्येष्ठ पत्रकार अकबर शेख, अविनाश पवार, हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष गणेश पवार, संजय पवार, सतीश पवार, मुराद आगा, वसीम आगा, मुजीर इनामदार, साजीद आगा, जावेद सय्यद, बालेशा देसाई, जमीर शेख , नोमान सय्यद, शहाबाज शेख , मुस्ताक सय्यद, सलीम देसाई, सागर माने इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

 

About the author

मुख्य संपादक : वसीम सय्यद

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

error: Content is protected !!