आपला कराड

01 सप्टेंबर रोजी कोयना बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा ; गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सत्कार

कराड : कोयना सहकारी बँक लि., कराड या बँकेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 01 सप्टेंबर२०२४ रोजी सकाळी ११-०० वाजता बॅकेचे मुख्य कार्यालय, लोकनेते स्व. विलासकाका पाटील (उंडाळकर) प्रवेशद्वार, शेती उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड, कराड येथे बोलविणेत आली असून सदर सभेस बँकेचे सभासदांनी बहुसंखेने उपस्थित रहावे असे अवाहन बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील यांनी केले आहे.
सभेमध्ये सभासदांच्या पाल्यांना शैक्षणिक कार्यात अधिक लक्ष केंद्रीत करून गुणवत्ता वाढविण्यास प्रोत्साहन मिळावे या मुलभूत हेतूने बँकेचे संस्थापक ऍड उदयसिंह पाटील (उंडाळकर ) व मान्यवरांचे शुभहस्ते पाल्यांचा गौरव सोहळा आयोजित करणेत येणार आहे. यामध्ये ट्रॉफी, रोख रक्कम, प्रशिस्ती पत्र देवून गौरव करणेत येणार आहे.

 

About the author

मुख्य संपादक : वसीम सय्यद

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

error: Content is protected !!