कराड : येथील रयत शिक्षण संस्थेचे, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागामार्फत नेट सेट परीक्षेची तयारी कशी करावी या विषयावरील एकदिवसिय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. डॉ. के. एन. धुमाळ तसेच पुन्हा कॉलेज पुणे येथील डॉ. इलियास सय्यद हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रो. डॉ. यू. बी. मोरे हे होते. कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले होते.
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी लिहिलेले नेटसेट या विषयावर पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. इलियास सय्यद यांनी नेट सेट परीक्षेचा अभ्यासक्रम व त्याची नेमकी तयारी कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. तर द्वितीय सत्रात डॉ. के. एम. धुमाळ यांनी प्रश्नांची काठिण्य पातळी कशी ओळखावी याचे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र, व जैव तंत्रज्ञानाच्या एकूण १६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ.ए.यु.सुतार यांनी केले तर आभार प्रा. डॉ. ए. व्ही. वाघमोडे यांनी मांनले. सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉ. आय. एन. खान यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्राणीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. शेवाळे, प्रा. डॉ. पार्टे, प्रा. डॉ. पाटील, प्रा. डॉ. खैरमोडे, कु. संगीता गुरव, कु. सुलक्षणा साडेकर यांनी विशेष प्रयत्न घेतले.
Add Comment