Front स्पॉट न्यूज स्पेशल

उपनिबंधकांनी ‘कराड अर्बन’ला मागितला खुलासा

जवळच्या लोकांना केलेले अनियमित कर्जवाटप;गुप्तठेवी;एकूण बँकेची कार्यपध्दती

कराड : काही ठराविक सभासद आणि यांचे हितचिंतक यांच्यासमोर पाघड्या घालून अनियमित आणि आरबीआयचे नियम पायदळी तूडवून केलेले कर्ज वाटप, गुप्त ठेवी, एका गुहेत(?) फक्त उमेदवारांच्या हजेरीत आणि ठराविकांना बोलावून घेतली गेलेली निवडणूक एकूणात बँकेच्या संशयास्पद कार्यपध्दतीबद्दल तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार केली गेली होती साधारण २ वर्षांपूर्वी व या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले गेले होते ६ महिन्यापूर्वी त्या तक्रारीवर कराड उपनिंबधकांना आता जाग आल्याने त्यांनी दि. कराड अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि; कराड या बँकेला संबंधित तक्रारीवर खुलासा मागविला आहे.
साधारण दोन वर्षांपूर्वी म्हणजेच निवडणूका पार पडण्यापूर्वी कराड अर्बनच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीवर आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याचबरोबर बँकेने केलेले कर्जवाटप, कर्जदारांनी दाखल केलेली दस्तऐवज यामध्ये त्रुटी दिसत असल्याने किंवा संशय असल्याने दोन्ही तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारींवर सहकार आयुक्त पूणे यांच्याकडून कागदी घोडे नाचविण्यापलिकडे कोणतीही हालचाल झालेली नव्हती. आम्ही समाजासाठी काहीतरी करतोय असे दाखविण्यासाठी आणि चमकोगिरीसाठी मागील वर्षी १० सप्टेंबर २०२३ रोजी अर्बन बँकेतर्फे वॉकाथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी झालेला खर्च व गतवर्षी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभा याचा खर्च हे खर्च कोणी केले याबद्दल देखील संशय असल्याने एकूणात बँकेची कार्यपध्दती संशयास्पद असल्याने त्यांच्या संपूर्ण कार्यपध्दतीची चौकशी व्हावी यासाठी तक्रार दाखल करण्यात आलेली होती. यावर कराड उपनिबंधक यांनी तब्बल सहा महिन्यानंतर (जाग आल्याने) अर्बन बँकेला पत्र धाडून खुलासा मागविला आहे.
संचालक मंडळाची झालेल्या निवडणूकीत कराड उपनिबंधक हे निवडणूक अधिकारी असतात, मात्र माहिती हवी असल्यास आम्हाला माहिती देण्याचा अधिकार नाही असे उपनिबंधकांकडून सांगण्यात येते. हीच परिस्थिती किंवा भूमिका जिल्हा उपनिबंधकांच्या बाबतीत दिसते. मागील आठवड्यात बँकेचे सभासद, ग्राहक यांनी जिल्हा उपनिबंधक सातारा यांच्या कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन केले होते. त्यावर जिल्हा उपनिबंधक यांनी उत्तर दाखल सदर बँकेची चौकशी करण्याचे व आदेश देण्याचे अधिकार आमच्याकडे नाहीत, उचित न्यायाधिकरणाकडे दाद मागावी असे लेखी उत्तर धाडले जे की हास्यास्पद असे वाटते. उपनिबंधक कराड हा बँकेच्या निवडणूकीचा निवडणूक निर्णय अधिकारी होऊ शकतो. मात्र चौकशी किंवा माहिती हवी असल्यास आयुक्तांकडे बोट दाखविले जाते. या उपर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक कराड यांची नेमणूक केली असल्याचा आदेश पत्रही उपनिबंधक कार्यालयात उपलब्ध नाही. बँकेची एकूण कार्यपध्दती आणि लोकसेवक म्हणून उपनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, शासकीय लेखापरिक्षक, सहकार आयुक्त यांची भूमिका देखील संशयास्पद आहे. एकीकडे हे सर्व अंधकारमय आहे मात्र काही बँक पोखरणार्‍या प्रवृत्तींमुळे राज्यभर शाखा विस्तार आणि तब्बल ८५ हजार सभासद असलेल्या बँकेचे भविष्य मात्र अंधारात आणि पूर्णपणे धोक्यात आहे हे ढळढळीत सत्य आहे. पुढे आणखी बरंच काही…

 

About the author

मुख्य संपादक : वसीम सय्यद

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

error: Content is protected !!