राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून अशातच आता काँग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठं विधान केलं आहे.
आता निवडणूक घेतली तर आपला पराभव होऊ शकतो असे सत्तेतील पक्षांना वाटत आहे. मात्र आमचा अंदाज असा आहे की , हे कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लांबवू शकत नाहीत.
त्यांना तसे करायचे असेल तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग असू शकतो. राष्ट्रपती राजवट लावल्यास काही चांगले होऊ शकते असा विचार सत्ताधारी करू शकतात.
सरकार टिकवण्यासाठी राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते. फक्त हा निर्णय राजकीय असू शकतो. सरकारची तयारी असेल तर ते असे करू शकतात, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
Add Comment