दि कराड अर्बन बँकेच्या सामान्य सभासदाचा संतप्त सवाल
कराड (दि. २२ जुलै) : दि. कराड अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि; (शेड्यूल्ड बँक) कराड या बँकेचे सर्व साधारण सभा ही दि. २८ जुलै २०२४ रोजी एका व्यावसायिक खाजगी ठिकाणी आयोजित केली आहे मात्र बँकेच्या आताच्या संशयास्पद विद्यमान चेअरमन(?) व संचालक (?) मंडळ यांना ही सभा घेण्याचा कायदेशीर अधिकार किंवा नैतिक अधिकार आहे का ? असा खडा सवाल संतप्त आणि बँकेकडून उघड उघड फसवणूक झालेल्या सभासदांकडून विचारला जात आहे.
दि. कराड अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि; (शेड्यूल्ड बँक) कराड या बँकेने २०२२ साली सभासदांना अंधारात ठेवून सभासदांची फसवणूक करुन परस्पर बँकेची संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पाडली. आपल्याच ठराविक हितचिंतकांना संधी देऊन शासनाच्या डोळ्यात धूळफेक करुन कायदा आणि आरबीआयची नियमावली पायदळी तूडवून बँकेची निवडणूकीचे सोपस्कार पूर्ण केले. या बेकायदेशीर आणि चुकीच्या निवडणूक प्रक्रियेविरुध्द निवडणूक कार्यक्रम पूर्ण होण्याआधी तक्रार झाली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी असेल विभागीय सहकार आयुक्त कार्यालय असेल किंवा निवडणूक प्राधिकरण असेल या तक्रारीकडे जाणिवपूर्वक दूर्लक्ष केले. ‘मॅनेज’ करण्याचे रोग जडलेल्या कराड अर्बन बँकेला ही निवडणूक सुध्दा ‘मॅनेज’ केली असल्याचे सभासदांचे स्पष्ट आरोप आहे.
निवडणूक कार्यक्रम पाहिले तर स्पष्टपणे दिसून येते की, बँकेवर आपलाच ताबा रहावा म्हणून काही ठराविक मंडळींनी ही निवडणूक प्रक्रिया अगदी गुप्त गुहेत घेतल्यासारखे निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. संचालक मंडळ निवडणूक उमेदवारांची यादी पाहिली तर यादी एरम कुटुंबातील ३ आणि जोशी कुटुंबातील २ असे बोगस संशयास्पद असलेल्या संचालक मंडळाच्या यादी मध्ये आहेत. अतिशयोक्ती म्हणजे यातील एक उमेदवार हा दोन ठिकाणी अर्ज करुन दोन्ही ठिकाणी ‘खुला प्रवर्ग’ आणि इतर मागास प्रवर्गातून संचालक घोषित करण्यात आला आहे. कराड अर्बन बँकेच्या या चुकीच्या कार्यपध्दतीविरोधात व २८ जुलै २०२४ रोजी होणार्या वार्षिक सर्व साधारण सभा तहकूब व्हावी यासाठी व एकूणात बँकेच्या कामकाजाची चौकशी व्हावी यासाठी बँकेचे अनेक सभासद जिल्हा उपनिबंधक सातारा जिल्हा यांच्या कार्यालयासमोर संजय उर्फ काकासोा चव्हाण, अशोक पाटील कालेकर, दशरथ पवार आदी सभासद, ग्राहक हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसले होते. वार्षिक सर्वसाधारण सभेदिवशी सभास्थळी थाळीनाद आंदोलन करणार असल्याचे लेखी पत्र जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांना दिल आहे. याची प्रत सहकार आयुक्त पूणे, जिल्हा पोलीस अधिक्षक, वरिष्ठ पोलीस निरिक्षक कराड शहर यांना दिली आहे. या सभेवेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेस त्यास जिल्हा उपनिबंधक जबाबदार राहतील असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सभा होणार की नाही हा याबद्दल देखील संशय आहे.
कराड अर्बन बँक ही ठराविकांची मक्तेदारी झाली आहे. संशयास्पद आणि बोगस(?) असलेल्या संचालक मंडळाला सर्व साधारण सभा घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे का ? असा सवाल आता बँकेचे सामान्य सभासद जो बँकेच्या मनीपॉवरच्या भिती आणि दहशतीखाली असलेले सामान्य सभासद दबक्या आवजात विचारत आहे. पढे आणखी बरेच काही…
Add Comment