Front

कराड दक्षिण मधून दोन अर्ज अवैध

260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघांमधील छाननी पूर्ण

कराड 30/10/2024 : २६०, कराड दक्षिण विधानसभा मतदार संघासाठी  एकूण २२ उमेदवारांनी २८ नामनिर्देशन पत्रे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे दाखल केली होती. यामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसकडून पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण,
भारतीय जनता पार्टीकडून अतुल सुरेश भोसले व
सुरेश जयवंतराव भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून इंद्रजित अशोक गुजर, बहुजन समाज पार्टीकडून विद्याधर कृष्णा गायकवाड, वंचित बहुजन आघाडीकडून संजय कोंडीबा गाडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) कडून मुकुंद निवृती माने आदी ६ पक्षांची ७ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. या सर्वांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरविण्यात आली. तर अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्रे दाखल केलेल्यांमध्ये गोरख गणपती शिंदे, विश्वजीत अशोक पाटील, रविंद्र वसंतराव यादव, गणेश शिवाजी कापसे, ऋषिकेश विजय जाधव, हमीद रहीम शेख, प्रशांत रघुनाथ कदम, प्रकाश यशवंत पाटील, महेश राजकुमार जिरंगे, विजय नथुराम सोनावले, शमा रहीम शेख, शैलेंद्र नामदेव शेवाळे, चंद्रकांत भिमराव पवार, जनार्दन जयवंत देसाई व सुवर्णसिंह शंकरराव पाटील आदी १५  जणांचा समावेश होता. त्यापैकी  हमीद रहीम शेख व सुवर्णसिंह शंकरराव पाटील  या २ जणांचे अर्ज अवैध ठरविण्यात आल्याची माहिती कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, नायब तहसीलदार हेमंत बेसके, युवराज पाटील यांनी दिली. दरम्यान नामनिर्देशनपत्रे माघार घेण्याची मुदत शासकीय सुट्टीचे दिवस सोडून दिनांक 4 नोव्हेंबर 2024 दुपारी 3 वाजेपर्यंत आहे.

 

About the author

मुख्य संपादक : वसीम सय्यद

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

error: Content is protected !!