Front

जगप्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांचे निधन

मुंबई : पद्मविभूषण सन्मानित प्रसिद्ध उद्योगपती रतन नवल टाटा यांचे 09 ऑक्टोबर 2024 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी निधन.  त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.  रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने रविवारी रात्री त्यांना मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी टाटा यांनी स्वतः ट्विट करत आपल्या प्रकृतीची माहिती दिली होती.
त्यांनी  स्वत: ट्विट केलेल्या ट्विटमध्ये आपल्या प्रकृतीची मीहिती दिली होती. “माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरवली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखे कोणतेही कारण नाही”, असे रतन टाटा म्हणाले होते.
टाटा यांना दाखल केल्याची बातमी समोर आल्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रकृती अधिकच खालावल्याने अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली.;त्यांचे पार्थिव शरीर
अंत्यदर्शनासाठी सकाळी 10 वाजता कोलाबा NCPA येथे ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती समोर आली आहे.

 

About the author

मुख्य संपादक : वसीम सय्यद

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

error: Content is protected !!