अंतरवली सराटीच्या आंदोलनातील लाठीचाजर्र् असो, पुसेसावळी असो की गजापूरची दंगल असो पोलीसांची भूमिका ही संशयास्पद
कराड : एक काळ असा होता की देशात महाराष्ट्र राज्याचा, राज्यातील पोलीसांचा आदर्श घेतला जायचा पण जेव्हा जेव्हा राज्यात भाजपचं सरकार सत्तेवर येते तेव्हा- तेव्हा राज्यात क्राईम वाढतो असा केंद्राचा निष्कर्ष आहे असे वक्तव्य पत्रकारांनी गजापूर आणि पुसेसावळी दंगलींवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले. अंतरवली सराटी मधील मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनामध्ये पोलीसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता, कोणाच्या सांगण्यावरुन,आदेशावरुन हे लाठीचार्ज करण्यात आले होते ? याचे उत्तर आजही महाराष्ट्र मागत आहे. मागील रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर येथे दंगेखोरांनी दंगल घडवून महिला असतील किंवा लहान मुले असतील त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसेच तेथील प्रार्थनास्थळाचे आतोनात नुकसान केले किंवा पुसेसावळीची घटना असो पोलीसांची भूमिका ही संशयास्पद होती. दंगल सदृश्य परिस्थिती असताना कायदा सुव्यवस्था नियंत्रित करणेसाठी पोलीस अधिक्षकांनी कठोर पाऊल उचलेली दिसत नाहीत. याबद्दल उच्च न्यायालानेदेखील या घटनांवर पोलीसांना खडसावले आहे. या विषयाशी संबंधित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले.
यशवंतनगर येथे सह्याद्रि साखर कारखाना स्थळी माजीमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आयोजित केलेल्या महिला मेळाव्यास प्रमुख पाहूणे म्हणून आलेल्या खा. सुप्रिया सुळे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलताना खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडीमध्ये कोणी किती जागा लढायच्या ते येत्या ८ ते १० दिवसांत चित्र स्पष्ट होईल. समृध्द असलेला अव्वल स्थानी असलेला महाराष्ट्र राज्य विकासामध्ये कोठेही दिसत नाही. ११८ कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हे शेतीखात्यामध्ये झालेला आहे असे आरएसएस आरोप केले आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करतील अपेक्षा होती पण आजपर्यंत कोणतीही चौकशी झालेली नाही. आपल्या राज्याचे पोलीसांचे काम चांगले असताना मंत्रीमंडळ किंवा सरकार गंभीर नसल्याने अशा घटना घडत आहेत. पूणे हे आज राज्याचे क्राईम कॅपिटल झाले आहे. घरं फोडा, पक्ष फोडा, पक्ष काढून घ्या, चिन्ह काढून घ्या असेच उद्योग सरकार करत आहे. शनिवारी पूणे येथे जिल्हा नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सरकारचा जीआर दाखवून आम्हाला बोलू न देणे म्हणजे ही दडपशाही आहे. गेले दहा वर्ष सातत्याने संसद भवनमध्ये मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मी सातत्याने केंद्र सरकारला प्रश्न विचारत आहे. त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांची समाधीस्थळी अभिवादन करत महाराष्ट्रातील जनतेला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. या पत्रकार परिषदेस माजी मंत्री बाळासाहेब पाटील, विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी नगरसेवक सौरभ पाटील, प्रशांत यादव होते.
Add Comment