कराड : जुन्या जॅकवेल ची दुरुस्ती करून कराड शहराचा पाणीपुरवठा सुरु झाला पण रात्री अचानक या ठिकाणची मोटर बंद पडली, मोटरीचे वायडिंगचे मोठे काम असून ती दुरुस्त होण्यास वेळ लागत असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांना काल दिली व त्यानुसार काल सकाळीच आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून जुन्या जॅकवेल ठिकाणी बंद पडलेली मोटर काढून नवीन मोटर बसवावी व याचा खर्च जिल्हा नियोजन मधून शासन करेल अशा सूचना केल्या त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कराड नगरपालिका मुख्याधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.
जुन्या जॅकवेल मधून शहराला पाणी पुरवठा केला जात असतानाच अचानक मोटर जळाली आणि यामुळे पाणीपुरवठा बंद झाला अशा परिस्थितीत मोटर दुरुस्तीचे काम करणे अत्यंत गरजेचे होते. अशा वेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शहरातील परिस्थिती लक्षात घेता मुख्याधिकारी यांच्याकडून माहिती घेतली व त्यानुसार जिल्हाधिकारी यांना फोन करून जुन्या जॅकवेल मधून तात्पुरता पाणीपुरवठा करणारी मोटर नादुरुस्त झाली असून त्यासाठी नवीन मोटर बसविन्याच्या सूचना आ. चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या व तो खर्च शासनाने करावा. त्याप्रमाणे कराड पालिका मुख्याधिकारी यांना जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या असून त्यावर पालिका प्रशासनाची अंमलबजावणी सुरु आहे.
Add Comment