Editor Choice स्पॉट न्यूज स्पेशल

काँग्रेसला फक्त मुसलमानांची मते हवी

सन्मान देताना मात्र पोटात गोळा

२०२४ च्या लोकसभा निवडणूकीत देशभरात विरोधी पक्षांना मिळालेली मते अन् निवडून आलेले उमेदवार आणि ४०० पारचा नारा देणार्‍या काठावर पास झालेला सत्ताधारी पक्ष भाजप हे चित्र सर्वांना विचार करायला लावणारा आहे. यामध्ये महाराष्ट्रात लोकसभेमध्ये नंबर एकचा पक्ष ठरला तो काँग्रेस. मुस्लिम, अल्पसंख्यांक आणि दलितांनी दिलेली लक्षणीय मते यामुळे राज्यात ३१ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. असे सर्व चित्र असताना मुस्लिम समाजाला ज्यावेळी संधी देण्याची, सन्मान देण्याची वेळ येते तेव्हा मात्र महाराष्ट्र काँग्रेसच्या पोटात गोळा उठतो. मुस्लिमांची मते हवी पण मुस्लिमांना न्याय नको अशी भूमिका नेहमीच महाराष्ट्र राज्य काँग्रेसची राहिलेली आहे. सध्या महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणूकीचे धामधूम फक्त पक्षीय गोतावळ्यात सुरु आहे. विधानपरिषद निवडणूक जाहीर झाली आहे. मात्र या निवडणूकीत ऐनवेळी काहीही चित्र होऊ शकते. राज्यातील सगळेच पक्ष आपले प्यादे सेट करत एकमेकांचे हातात घालून फक्त औपचारिकता म्हणून निवडणूक प्रक्रिया पार पाडू शकतात. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. पक्षीय बलाबल पाहिले तर महायुतीचे १९९ तर महाविकास आघाडीची ६५ इतकी मतांची संख्या आहे. यामध्ये काँग्रेसकडे ३७ इतकी मते आहेत. २३ मतांची गरज आहे १४ मते अधिकचे काँग्रेसकडे आहेत. प्रज्ञा सातवच्या यांच्या माध्यमाने काँग्रेस फक्त एका जागेवर निवडणूक लढवत आहे. विधानपरिषद किंवा राज्यसभेवर वंचित, शोषित, संघर्षीत असलेल्या मुख्य प्रवाहापासून दुर असलेल्या मुस्लिम समाजाला आपल्या वेदना लोकांपर्यंत सरकारपर्यंत पोहोचविण्याकरिता काँग्रेसने औदार्य दाखवायला हवे होते. मात्र तसे काही झाले नाही. देशातून हद्दपारीच्या उंबरठ्यावर असलेल्या काँग्रेसला अगदी केंद्राच्या विरोधी पक्ष नेत्याच्या बाकावर बसविण्यात मुस्लिमांचा वाटा मोठा आहे. यामध्ये संविधान वाचविण्याच्या दृष्टीने, महागाई, बेरोजगारी अन् विकासाच्या नावे सुरु असलेया भ्रष्ट कारभाराविरोधात सर्वच घटकांनीही मोठे योगदान दिले आहे. त्यामध्ये मुस्लिम देखील होते. तसे मुस्लिम समाजाच्या तोंडावर पाने पुसण्याचा काँग्रेसचा ईतिहास हा काही नवा नाही. असे अनेकवेळा अनेक ठिकाणी काँग्रेसने मुस्लिम समाजाला खांद्यावर हात ठेवून व पाठीत खंजीर खुपसत अनेकवेळा फसवले आहे. ट्रिपल तलाकच्यावेळी तर काँग्रेसने वॉकआऊट केले होते. अगदी विचार केल्यास पश्चिम महाराष्ट्रात मुस्लिमसमाजातून असा एक कार्यकर्ता काँग्रेसने पुढे आणण्याचा प्रयत्न केला का ? सातारा जिल्हाध्यक्षपदासाठी ५० ते ६० वर्षांपासून पक्षाची सेवा आणि कार्य करणारे बाळासाहेब बागवान हे किमान जिल्हाध्यक्ष पदासाठी (पात्र तर ते राज्यसभा आणि विधानपरिषदेला देखील होते) का होईना पात्र होते. दिले का त्यांना जिल्हाध्यक्ष पद ? काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदासाठी झाकीर पठाण हे नांव संपूर्ण जिल्हाभर चर्चेत होते. अचानकपणे कोणीतरी जाधव म्हणून त्या पदावर बसविले. मुस्लिम समाजाला सन्मान देताना असा कोणीतरी उगवतोच. बरं कोठे दिसतात का हे जाधव ? कराड दक्षिणचा अध्यक्ष सगळीकडे दिसतो. मात्र जाधव ? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मागील लोकसभा कार्यकाळ असो किंवा मुख्यमंत्री नंतरचा कराड दक्षिणचा कार्यकाळ असो मुस्लिम समाजाने २०१४ असेल किंवा २०१९ असेल झुकते माप हे पृथ्वीराज बाबांकडेच दिले आहे. माजी मुख्यमंत्री बाळासाहेब बागवान सारख्या कार्यकर्त्याला दुखावून ज्यांचे ‘नाना’ प्रकारचे लाड पुरविले ते तरी राहिले का त्यांच्यासोबत ? माजी मुख्यमंत्री यांच्या मातोश्री प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या राजकारणापासून १९८२ पासून ज्यांनी अगदी चालक बनून सेवा दिली. त्या कार्यकर्त्याला विनाकारण ३०७ च्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून २ महिने आत बसविले. त्यावेळी माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते दिल्लीत का मुंबईत कुठेतरी महत्वाच्या मीटिंगमध्ये आहेत असे सांगण्यात आले. मुंबई, दिल्ली सोडा पृथ्वीराज बाबा अमेरिकेत जरी असते तरी एक फोन तरी करू शकले असते. स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्याला किंवा पोलीस प्रशासनाला सत्यता पडताळून गुन्हा दाखल करावा म्हणून. (ज्याने बसविले तोही काँग्रेसचाच बरं का…) बरं कशासाठी याचे उत्तर शोधाल तर ‘लँड माफिया’ नावाने अख्ख पुस्तक तयार होईल. 2016 साली कराड नगर परिषदेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष ही लोकमातातून निवडायचे होते आणि याच निवडणूक भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला. त्याचबरोबर त्याकाळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर असलेली आणि कराड नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारीच्या रिंगणात असलेले हनुमंत पवार हे निवडून येतात मात्र त्यांच्याबरोबर असलेली मुस्लिम महिला उमेदवार पराभूत होती अशीच परिस्थिती प्रभाग क्रमांक चार मध्ये राजेंद्र आप्पा माने हे निवडून येतात मात्र त्यांच्याबरोबर असलेली मुस्लिम महिला उमेदवार ही पराभूत होते. पृथ्वीराज बाबा गटातून मुस्लिम समाजातून जवळपास सहा उमेदवार देण्यात आली होती मात्र एकही उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला नाही हे ढळढळीत सत्य आहे. काँग्रेसचे युवा नेते शिवराज मोरे यांचा प्रभाव असलेल्या शुक्रवार पेठेत विजयी भाजपला पडलेली मते विचार करायला लावणारी होती. एमआयएमला पडलेल्या लक्षणीय मतांवरून ‘बील’ मात्र मुस्लिम समाजावर फाटले. सप्तपदी आमदार राहिलेले आमदार स्व. विलासकाका व गट यांना तर मुस्लिम समाज सोडाच पण पत्रकारांचीही ऍलर्जी. खरेदी विक्री संघ, कोयना बँक, कोयना दूध संघ, बाजार समिती या संस्थामध्ये मुस्लिम समाजातील किती लोकांना यांनी संचालक किंवा सभापती पद दिले. यांनाही मुस्लिमांची आठवण झाली ती त्यांच्या 35 वर्षाच्या विजयी कारकिर्दीला 2014 साली ब्रेक लागल्यानंतर. 2014 साली पराभव झालेनंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी यांनी पत्रकारांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वी कराड शहराचा कराड दक्षिणमध्ये समाविष्ट झालेनंतर पत्रकार परिषद किंवा संवाद घेतलेचा ऐकिवात नाही. स्वातंत्र्योत्तर काळानंतर गेले 70 ते 75 वर्षात बहुतांशी काळ सत्ता ही काँग्रेसकडेच राहिलेली स्वातंत्र्य भारताचे पहिले शिक्षणमंत्री हे मुस्लिम समाजातील मौलाना अबुल कलाम आझाद होते मात्र त्या समाजातील आजची शैक्षणिक परिस्थिती पाहिली अछूत आणि आदिवासींपेक्षाही वाईट परिस्थिती मुस्लिमांची दिसते. संविधान वाचविण्यासाठी म्हणा किंवा आपल्या देशातच असुरक्षेची भावना निर्माण झालेल्या मुस्लिम समाजाने सत्ताधारी पक्षाच्या विरोधी पक्षांना भरभरून मते दिली. काँग्रेसला सन्मानाने विरोधी पक्ष नेतेपदी पोहोचविले आहे. मात्र काँग्रेससाठी “दिल्ली अभीभी बहुत दूर है” हेही वास्तव आहे. बालेकिल्ला मानणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस(दोन्ही गट) पक्षाचीही मुस्लिमांबद्दलची भूमिका ही काही वेगळी नाही. 2024 च्या किंवा त्यापूर्वी घडलेल्या काही घटनांमुळे मुस्लिम समाजाची पहिली पसंती ही उद्धव ठाकरे हे आहेत त्यानंतर शरद पवार गट आणि गद्दारी केल्यामुळे म्हणा किंवा लोकांना त्यांची भूमिका न पटल्यामुळे म्हणा एकनाथ शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असेल हेही मुस्लिम समाजाच्या दृष्टीने काँग्रेस पेक्षा वरच्या स्थानावर आहे याचाही सारासार विचार काँग्रेसने येणाऱ्या काळात करावा

 

Advertisement

error: Content is protected !!