आपला कराड स्पॉट न्यूज स्पेशल

लोकनेते विकासकाका यांचे पूर्णाकृती पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते उद्या अनावरण

कराड : कराड येथील कोयना सहकारी बँकच्या प्रशासकिय कार्यालयचे उदघाटन व बँकेच्या आवारात उभा केलेल्या माजी मंत्री लोकनेते स्व. विलासकाका पाटील- उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण समारंभ दि. १५ जुलै रोज़ी दुपारी २ वाजता मार्केट यार्ड कराड येथे बाजार समितीच्या आवारात आयोजित केला आहे.

स्व. विलासकाका पाटील- उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमास भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे आ. भाई जयंत पाटील यांचे हस्ते होणार आहे. तर कोयना बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे उदघाटन माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण हे असणार आहेत.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मध्ये माजी राज्यपाल, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सामाजिक न्याय मंत्री, माजी खासदर जयवंतराव आवळे, राज्यमंत्री आ सतेज पाटील, माजी राज्य मंत्री आ. विश्वजीत कदम,सांगलीचे खा. विशाल पाटील, आ संग्राम थोपटे,विचारवंत मधुकर भावे, आ.अरुण लाड,आ.जयंत आसगांवकर यासह सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.काकांच्या मार्गदर्शना खाली बँकेचा वटवृक्ष झाला असून या बँकेच्या मुख्य कार्यालयाचे उदघाटनाचे औचित्य साधून काकांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण समारंभ ही संचालक मंडळाने आयोजित केला आहे.

कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून मार्केट यार्ड कराड गेट नं ४ येथील कोयना बँक मुख्य कार्यालय ते बाजार समिती कार्यालय आवारात भव्य मंडप उभारण्यात आला आहे.कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून सभासद, ठेवीदार,तालुक्यातील शेतकरी, हितचिंतकांनी पुतळा अनावरण कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संस्थापक अँड उदयसिंह पाटील यांनी केले आहे.

कोयना सहकारी बँकेची स्थापना १९९६ साली स्व. विलासकाकांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे हस्ते केली होती.तोच धागा पकडत उदयदादानी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे उदघाटन स्व.भाऊसाहेब थोरात यांचे सुपुत्र आ बाळासाहेब थोरात यांचे हस्ते घेतले आहे. यानिमित्ताने अनोखा योगायोग जुळून आला आहे.

 

Featured

Advertisement

error: Content is protected !!