जिल्हा

पाचगणी येथील हॉटेल हिराबाग(बिलीव्ह)वर पोलीसांची मोठी कारवाई

पाचगणी : भिलार (कासवंड) पाचगणी येथील हॉटेल हिराबाग (बिलीव्ह) येथील विभत्स डान्सवर पाचगणी पोलीसांनी मोठी कारवाई केली. पाचगणी सारख्या जागतीक पर्यटन ठिकाणी गायिकांच्या व महिला वेटरच्या नावाखाली बारबाला महिला आणुन त्यांना संगिताच्या तालावर उत्तान कपडयात नाचविण्याचा बिभत्स प्रकार सुरु होता याची माहिती पाचगणी पोलीसांना मिळाली. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. भालचिम यांनी कडक कारवाई करणेबाबत निर्देश दिले होते. वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणे सपोनि दिलीप पवार यांच्या पथकाने भिलार कासवंड, पाचगणी येथील हॉटेल हिराबाग हॉटेलच्या हॉलमध्ये गायीकांच्या व महीला वेटरच्या नावाखाली हॉटेल मालक यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहुन काही महीला आणुन संगिताचे तालावर उत्तान कपडयात बिभत्स नृत्य करीत असलेबाबत माहिती मिळाल्याने सपोनि पवार व पथकाने छापा टाकला. यामध्ये साधारण १२ महिला काही पुरुष गिर्‍हाईकांसमोर नृत्य करत त्यांच्याशी लगट करत असल्याचे निदर्शनास आले. यावर तात्काळ कारवाई करुन संबंधित नृत्य करणार्‍या महिला व जवळपास २० पुरुष व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. हॉटेल मालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावरही कारवाई करणेत आली आहे. व हॉटेलमधील साऊंड सिस्टीम, माईक, मोबाईल व कार असा एकुण २५,४५,५००/- रू किंमतीचे साहीत्य जप्त करून ताब्यात करण्यात आले आहे. संबंधितांवर भा. न्या. सं. कलम २९६, २२३ महाराष्ट्र हॉटेल आणि मध्यपानकक्ष (बाररुम) मधिल अश्लिल नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व महीलांचे प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनीयम २०१६चे कलम ३,८ महाराष्ट्र दारूबंदी अधिनीयम ७५ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे. सदर कारवाई ही सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. भालचिम यांच्य मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलीस ठाणे सपोनि दिलीप पवार यांच्यासोबत पोलीस उप निरीक्षक बालाजी सोनुने, सफौ रविंद्र कदम, पोहवा श्रीकांत कांबळे ब.क्र.१२८३, पो. हवा. कैलास रसाळ ब.क्र.१३७४, पो. हवा. विनोद पवार ब.क्र.६४४ पो.हवा. सचिन बोराटे ब.क्र. ११५८, पोलीस नाईक तानाजी शिंदे ब.क्र.९६२, पो.काँ. उमेश लोखंडे ब.क्र.७६२, पो.काँ. सुमित मोहिते ब.क्र.१४०६, म.पो.हे.काँ. रेखा तांबे ब.क्र.२१८२ या पथकाने ही कारवाई बजावली. पुढील तपास सपोनि दिलीप पवार करत आहेत.

 

Featured

Advertisement

error: Content is protected !!