सातारा गुन्हे शाखा व कराड शहर पोलीस ठाणेची कारवाई
कराड : कराड येथील गोळेश्वर गावच्या हद्दीतील पवार वस्ती येथील रस्त्यावर विनापरवाना बेकायदेशीर पिस्टल व काडतुस विक्री व खरेदीसाठी आलेल्या तिघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. १) आकाश हिंदुराव चव्हाण, वय २७ रा. कार्वेनाका कराड, २) तेजस भाऊ गुरव, वय २४ रा. हजारमाची ता. कराड ३) जय लहूराज कणसे वय २० रा. मायणी ता. माण असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आक्या चव्हाण रा. कार्वेनाका (कराड) हा बुधवार, (दि. २८) रोजी कार्वेनाका ते गोळेश्वर रस्त्यावर त्याच्याकडील बेकायदेशीर विनापरवाना पिस्टल व काडतुसे एका पार्टीस विक्री करण्यासाठी थांबला असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून मिळाली. त्यानंतर कराड शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व त्यांच्या पथकाने गोळश्वर रस्त्यावरील पवारवस्ती येथे पोहचत रचून त्यांना पकडण्यात आले.सातारा गुन्हे शाखा व कराड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
सदर झालेल्या कारवाईमध्ये संशयितांकडून २ पिस्टल ३ जिवंत काडतुसे असे एकूण १ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार विजय राजाराम मुळे (वय 43) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. तसेच यापुढेही असे काही संशयित प्रकार आढळल्यास त्यावर त्वरित कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिल्या आहेत.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. अमोल ठाकुर, पोलीस उपविभागीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार सपोनि दत्तात्रय दराडे, सपोनि रोहित फारणे सातारा, सपोनि अशोक भापकर, कराड शहर पोलीस ठाणे, पोउनि विश्वास शिंगाडे, पारितोष दातीर, कृष्णा डीसले, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित सपकाळ, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, अमित माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, गणेश कापरे, ओंकार यादव, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, रवीराज वरणेकर, शिवाजी गुरव तसेच कराड शहर पोलीस स्टेशनकडील विजय मुळे, अनिल स्वामी, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, संग्राम पाटील, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी कारवाई केली.
सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून गेले नोवेंबर २०२२ पासून ते आजपर्यंत (जानेवारी २०२५ पर्यंत) १११ देशी बनावटीचे पिस्तुले, १२ बोरचे ४ बंदूक, २ रायफल, २६० जिवंत काडतुसे, ३८४ रिकामे झालेले काडतुसे ५ रिकामे मॅगझीन जप्त करण्यात आल्याची माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Add Comment