कराड (समीर बागवान) : तांबवे (ता.कराड) गावची सुकन्या कु.तेजल तानाजी पाटील हिची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंतापदी निवड झाली आहे.
आयबीपीएस मार्फत ऑक्टोंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये तांबवे गावची सुकन्या कु. तेजल पाटील हिने महाराष्ट्र राज्यातून 181 क्रमांकाने व मुलींमध्ये सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन दैदीप्यमान संपादन केले आहे. कु.तेजल हिचे प्राथमिक शिक्षण दक्षिण तांबवे येथील जिल्हा परिषदेत शाळेत आणि माध्यमिक शिक्षण आण्णा बाळा पाटील विद्यालय तांबवे व यशवंत हायस्कूलच्या गुरुकुलमध्ये झाले. तसेच उच्च माध्यमिक शिक्षण सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड येथे झाले. त्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथून तिने इलेक्ट्रिक इंजिनिअरची पदवी संपादन केली. यादरम्यान तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. अतिशय जिद्दीने आणि चिकाटीच्या जोरावर कु.तेजल हिने आयबीपीएस परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असलेली कु.तेजल पाटील हिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये एक आदर्श निर्माण झाला आहे.
कु. तेजल पाटील हिला आजी श्रीमती शहाबाई शंकर पाटील व आजोबा लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे माजी संचालक मानसिंगराव नलवडे यांच्यासह आई-वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कु.तेजल पाटील हिची महावितरणच्या सहाय्यक अभियंता पदी निवड झाल्याबद्दल तिचे तांबवे गावच्या सरपंच सौ.जयश्री कबाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील,सौ.विजयाताई पाटील, आण्णासो पाटील, पाटण अर्बन बँकेचे उपाध्यक्ष धनंजय ताटे,सह्याद्री कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, कराड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन हणमंतराव चव्हाण,लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडुरंग नलवडे, सौ.सुनंदा पाटील, मनीषा साठे आदी मान्यवरांनी व ग्रामस्थांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Add Comment