सातारा दि. 7 :- लोकसेवकांच्या भ्रष्टाचाराविषयी तक्रारींच्या संदर्भात नागरिकांच्या सुविधेकरीता पोलीस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, सातारा हे सातारा जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी शासकीय विश्रामगृहात सकाळी 11 ते सायं. 5 वा. पर्यंत उपस्थित राहणार आहेत. गुरुवार दि.10 ऑक्टोबर रोजी मेढा येथे, शुक्रवारी दि.11 ऑक्टोबर महाबळेश्वर येथे, सोमवार दि. 14 ऑक्टोबर वाई येथे, मंगळवार 15 ऑक्टोबर कराड येथे, बुधवार 16 ऑक्टोबर खंडाळा येथे, गुरुवार 17 ऑक्टोबर पाटण येथे, शुक्रवार 18 ऑक्टोबर कोरेगाव येथे, सोमवार 21 ऑक्टोबर फलटण येथे, मंगळवार 22 ऑक्टोबर दहिवडी येथे, बुधवार 23 ऑक्टोबर रोजी वडूज येथे शासकीय विश्रामगृहात उपस्थित राहणार आहेत.
नागरिकांनी आपली तक्रारी व माहिती समक्ष सादर करण्याचे आवाहन अँटी करप्शन ब्युरो, सातारचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी केले आहे.
Add Comment