जिल्हा

छत्रपती संभाजी नगर येथे ९ ऑगस्ट रोजी भव्य “दिव्यांग आक्रोश” मोर्चा

सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे: जिल्हाध्यक्ष सौ.सुरेखा सुर्यवंशी यांचे आवाहन

कराड : दिव्यांग, विधवा, वृध्द, शेतकरी,अनाथ यांच्या विविध मागण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ.बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २ वाजता छत्रपती संभाजी नगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य “दिव्यांग आक्रोश” मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आक्रोश मोर्चात सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे सातारा जिल्हाध्यक्ष सौ.सुरेखा सुर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, दिव्यांगाना प्रति ६ हजार रुपये पेन्शन देण्यात यावी,ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगर पालिकेमध्ये दिव्यांगाना राजकीय आरक्षण देण्यात यावे, भूमिहिन, वेघर, दिव्यांगाना राहण्यासाठी १ गुंठा जागा देण्यात यावी,सार्वजनिक ठिकाणी व सरकारी कार्यालय आडतळा विरहित करा, दिव्यांगाची १० लाखाची आरोग्य विमा पॉलिसी सरकारने काढावी,दिव्यांगाना सरकारी नोकरी देण्यात यावी,दिव्यांगाना व्यवसाय करण्यासाठीं जागा द्यावी, वृध्द. विधवा, महिलांसाठी उत्पन्नाची अट १ लाखा पेक्षा जास्त करावी, विधवा महिलासाठी महामंडळाची स्थापना करावी, दिव्यांगाना लाईट बिल व कर यामध्ये ५० टक्के सुट द्यावी, बाझार समिती, सहकार क्षेत्र साखर कारखाने यांच्यावर किमान ९ दिव्यांग प्रतिनिधीत्व देण्यात यावे आदी मागण्या या भव्य “दिव्यांग आक्रोश” मोर्चात करण्यात येणार आहे.
या भव्य “दिव्यांग आक्रोश” मोर्चात सातारा जिल्ह्यातील दिव्यांग, विधवा, वृध्द, शेतकरी,अनाथ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे सातारा जिल्हाध्यक्ष सौ.सुरेखा सुर्यवंशी यांनी केले आहे.

 

Advertisement

error: Content is protected !!