चेअर,फोल्डींग वॉकर,कमोड खुर्ची,चष्मा श्रवण यंत्रासाठी थेट मदत 3 हजार
सातारा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरीकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना लागु करण्यात आलेली आहे. या योजनेत जिल्हयातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणा-या अपंगत्व,अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य साधणे/उपकरणे खरेदी करणेकरीता तसेच मन:स्वास्थ केंद्र,योगोपचार केंद्र इ. व्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ् अबाधित ठेण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना लागू करण्यात आलेली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त, समाज कल्याण,सातारा यांनी दिली.
सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे करीता मा.अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सातारा यांनी पुढिल प्रमाणे सुचना दिल्या. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र,उपजिल्हा रुग्णालय यांच्या मार्फत असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण (पॉप्युलेशन बेस्ड स्क्रिनिंग) व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरीकांचे सर्वेक्षण स्क्रिनिंग घरोघरी जाउुन करण्यात येते.त्याच प्रमाणे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी ग्रामीणस्तरावरील व जिल्हा शल्य चिकित्सक सार्वजनिक रुग्णालय सातारा यांनी शहरी भागातील आपल्या अधिनस्त असलेल्या तालुका स्तरावरील आरोग्य अधिकारी यांचे मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्राव्दारे आरोग्य शिबीराचे आयोजन करावे सदर शिबीरामध्ये आशा स्वयंसेविका यांचे सहायाने 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरीकांचे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे विहित नमुण्यातील अर्ज भरुन घ्यावेत तसेच अ.क्र.01 ते 27 मुदयांमध्ये माहिती व अर्ज तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडे देण्यात यावी. तालुका आरोग्य अधिकारी यांनी सदरची माहिती व अर्ज संकलीत करुन सहायक आयुक्त,समाज कल्याण,सातारा या कार्यालयास सादर करण्यात यावेत.
सदरचे काम हे आठ दिवसामध्ये पुर्ण करण्यात यावे. तसेच याबाबतचा आढावा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी व जिल्हा शल्य चिकित्सक सार्वजनिक रुग्णालय सातारा यांचेकडुन दररोज घेण्यात यावा. या सुचना मा.जिल्हाधिकारी व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी दिल्या. त्याच बरोबर सदर योजनेचा लाभ 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरीकांनी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
Add Comment