- कराड : कराड शहराचा पाणी प्रश्न वाढत असून अशी आणीबानी याआधी क्वचित निर्माण झाली असावी पण सद्या हा पाणी प्रश्न मोठा निर्माण झाला आहे. याचमुळे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहकार्याने कराड शहरासाठी आणखी 20 पिण्याच्या पाण्याचे टँकर शहरवासियांसाठी दाखल झाले आहेत. पाणी प्रश्न परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी कराड शहरात 10 टँकर सेवेत होते पण आता आणखी 20 टँकर कराडच्या पाणी प्रश्न आपल्या परीने मिटविण्यासाठी कराडकरांच्या सेवेसाठी उपलब्ध केले आहेत. पिण्याच्या पाण्याचे टँकर किमान 4000 लिटर चे असून एकूण 30 टँकर च्या माध्यमातून कराड शहराला दररोज 1 लाख 20 हजार लिटर पाणी उपलब्ध होत आहे. यासाठी माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे सहकार्य मिळाले आहे.
कराड शहरासाठी पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन नदीच्या पाण्यातून वाहून गेली असल्याने कराड शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. याचं परिस्थितीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीने पालिका अधिकारी तसेच प्रांतधिकारी, हायवेचे अधिकारी व MGP चे अधिकारी यांची संयुक्तिक मिटिंग घेऊन प्रमुख 5 सूचना केल्या होत्या. त्या सूचनांची काही प्रमाणात अंमलबजावणी पालिका प्रशासनाकडून झाली आहे. पण तरीसुद्धा कराड शहराचा पाणी प्रश्न गंभीर होत गेल्याने आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पलूस कडेगाव चे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांना संपर्क करून त्यांना अतिरिक्त पाण्याच्या टँकर ची मागणी केली त्यानुसार डॉ. विश्वजित कदम यांच्याकडून 20 पाण्याचे टँकर तातडीने पाठविण्यात आले. त्यानुसार आधी कराडमध्ये सेवा देत असलेले 10 टँकर सहित आणखी 20 टँकर असे 30 पिण्याच्या पाण्याचे टँकर मलकापूर पाणी योजनेतून भरून कराड शहरासाठी सेवेसाठी दाखल झाले आहेत.
Add Comment