पुणे : ससूनच्या कर्मचाऱ्यांनीच 4 कोटी 18 लाख 62 हजार रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी ससून रुग्णालयाचे अकाउंटंट अनिल माने आणि रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार यांच्यासह अन्य 23 सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी रोखपाल, लेखपाल यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील रुग्णालयातील १६ कर्मचारी आहेत.
याबाबत रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे (वय ५५, रा. पिंपळे गुरव) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तत्कालीन लेखपाल अनिल माने (वय ५३, रा. हडपसर), रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार (वय ४५, रा. क्वीन्स गार्डन, कॅम्प) यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३१ जुलै २०२३ ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान घडला आहे.
रक्कम ट्रान्सफर केलेल्यांची नावे निलेश शिंदे (कक्ष सेवक), सचिन ससार (वरिष्ठ लिपिक, शासकीय महाविद्यालय, बारामती), पुजा गराडे (वरिष्ठ लिपिक, शासकीय महाविद्यालय, बारामती), सुलक्षणा चाबुकस्वार (वरिष्ठ सहायक, रोखपाल), सुनंदा भोसले (आया, सेवानिवृत्त), सुमन वालकोळी (अधि. परिचारिका, ससून), अचृना अलोटकर (अधि. परिचारिका), मंजुशा जगताप (अधि. परिचारिका), दिपक वालकोटी (वरिष्ठ लिपिक, शासकीय महाविद्यालय, बारामती), सरिता शिर्के (खासगी व्यक्ती), संदेश पोटफोडे (खासगी व्यक्ती), अभिषेक भोसले (खासगी व्यक्ती), संतोष जोगदंड (वरिष्ठ लिपिक, ससून), दयाराम कछोटिया (शासकीय महाविद्यालय, बारामती), श्रीकांत श्रेष्ठ (कनिष्ठ लिपिक, ससून), भारती काळे (खासगी व्यक्ती), उत्तम जाधव (सेवानिवृत्त, सिटी स्कॅन तंत्रज्ञ), संदिप खरात (वैद्यकीय समाजसेवक, अधिक्षक, ससून), अनिता शिंदे (खासगी व्यक्ती), नंदिनी चांदेकर (अधि़ परिचारिका, ससून), सरिता अहिरे (खासगी व्यक्ती), शेखर कोलार (खासगी व्यक्ती), सरिता लहारे (अधि़ परिचारिका, ससून), राखी शहा (खासगी व्यक्ती) यांच्या बँक खात्यावर ४ कोटी १८ लाख ६२ हजार ९४२ रुपये जमा करण्यात आले असून त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.
Add Comment