कराड : रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल १ ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर झाला. सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड संचलित बॅरि. पी.जी. पाटील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी अभिरूप मुलाखत सत्राचे आयोजन केले होते. या अभिरूप मुलाखतीस १४ उमेदवार उपस्थित राहिले. त्यापैकी १० उमेदवारांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली.
निवड झालेल्या उमेदवारांमध्ये प्रल्हाद बाबासो पवार, करण खंडू चिंचणकर, अमित श्रीरंग मोरे, मनोज गणेश गुप्ता, तानाजी ज्ञानू वाघमोडे, सुरज पोपट होवाळ, रोहित शांताराम गुजर, कु. हिना बादशहा मुल्ला, कु. स्वरांजली सूर्याजी नलवडे, कु. तेजस्विनी श्रीधर माणगावे या १० उमेदवारांनी पोलीस उपनिरीक्षक पद मिळवून उज्ज्वल यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
एका बाजूला बेरोजगारीच्या संकटाला सामोरे जाताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सर्वच उमेदवारांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. पारंपारिक तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन बहुतांश विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. सध्याच्या युवावर्गामध्ये शासकीय अधिकारी पद मिळण्यासाठी क्रेझ वाढत आहे. त्यासाठी हे विद्यार्थी १० ते १२ तास अभ्यास करून प्रशासकीय सेवेत येण्याचे स्वप्न साकारत आहेत. अगदी त्याच पद्धतीने या उमेदवारांनी या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. त्याबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
या उज्ज्वल यशाबद्दल महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य प्रा. एस.ए. पाटील, उपप्राचार्य प्रा. नेताजी सूर्यवंशी, उपप्राचार्या प्रा.सौ.एम.बी. कांबळे, रजिस्टार डॉ. ए.जे. सकटे, स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक प्रा. योगेश कस्तुरे, समन्वयक प्रा. सुभाष शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे केंद्राने गेल्या अनेक वर्षांची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखून भरघोस यश संपादन केले आहे.
Add Comment