क्रीडा

सियाल सलीम शेख याचे वाई फेस्टिव्हल २०२४ उत्कर्ष श्री आणि महाराष्ट्र शिवनेरी श्री २०२४ या दोन्हीही शरीरसौष्ठव स्पर्धेत सर्वोच्च यश

कराड : वाई फेस्टिव्हल २०२४ यांच्या वतीने जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा उत्कर्ष श्री २०२४ दि. २०/१२/२०२४ रोजी महागणपती घाट, वाई येथे आयोजित करण्यात आलेली होती त्या स्पर्धेत सियाल सलीम शेख याने मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक व उत्कर्ष श्री २०२४ हा किताब पटकाविला. या यशाबद्दल त्याचे सर्वचवक्षेत्रांमधून कौतुक होत आहे. इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन संल३/४ महाराष्ट ्र बॉडी बिल्डींग असोसिएशनच्या मान्यतेने महाराष्ट ्र राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा महाराष्ट्र शिवनेरी श्री जुन्नर २०२४ ही स्पर्धा शिवनेरी रोड, शिवनेरी फिटनेस बारव, जुन्नर येथे दि. २८/१२/२०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये मेन्स फिजिस गटात सियाल सलीम शेख याने ५ वा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक सहभागी झाले होते. सियाल सलीम शेख याचे मिळालेल्या यशाबद्दल दि. कराड अर्बन को – ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सीए. दिलीप गुरव सदैव अर्बन कुटुंबातील सर्व यशस्वी स्पर्धकांचे कौतुक करण्यात अग्रणी असतात.वदि. कराड अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने सत्कार करताना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, महाव्यवस्थापक सलीम शेख, दीपक आफळे, महेशकुमार वेल्हाळ, सीए धनंजय शिंगटे यावेळी उपस्थित होते.

 

About the author

मुख्य संपादक : वसीम सय्यद

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!