Uncategorized

सर्व सामन्यांच्या पसंती असलेली अग्रणी बॅंक- ‘कोयना सहकारी बॅंक ’

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या मुशीत घडलेले व यशवंत विचारांचा वारसा व वसा जोपासत ग्राम ते राज्यस्तरावर सहकार क्षेत्रात भरीव काम करून सहकार चळवळीला दिशा देणारे स्व. लोकनेते विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या 86 व्या जयंतीचे औचित्य साधुन त्यांनी स्थापन केलेल्या कोयना सहकारी बॅंकेच्या प्रांगणात त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ व बॅंकेच्या प्रशासकीय कार्यालयाचा उद्घाटन समारंभ आज राज्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.त्यानिमित्ताने टाकलेला एक दृष्टीक्षेप …………

स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी कृषी व औद्यॊगिक समाजनिर्माण करणेकरिता सहकारी क्षेत्राची निर्मिती केली.या सहकारी चळवळीला चालना देत असताना स्व.विलासकाकांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेबरॊबर तालुक्यातील सहकारी शिखर संस्थांच्या विकासाला चालना दिली. सर्वसामन्याचे आर्थिक जीवनमान उंचवावे व आर्थिक पिळवणुक थांबवावी या उध्दात हेतूने माजी सहकार मंत्री स्व विलासकाका पाटील उंडाळकर यांनी सन 1996 साली कोयना सहकारी बॅंकेची स्थापन करून छोटेसे रोपटे लावले.या रोपट्याचा वटवृक्ष झाला असून संस्थापक चेअरमन व तालुक्यातील शिखर संस्थांचे मार्गदर्शक ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बॅंकेची उत्तरोत्तर प्रगतीची घौडदौड चालु आहे.दोन दशकाहुन अधिक काळ अर्थकारणात कार्यरत असणा-या बॅंकेची सांपत्तिक स्थिती पाहता सर्वसामन्यांच्या पसंतीला उतरली आहे. बॅंकेच्या 11 शाखा व 1 विस्तारीत कक्ष असुन भागभांडवल 6 कोटी 76 लाख आहे. निधी 15 कोटी 89 लाख आहे. ठेवी 177 कोटी 41 लाख ,कर्जे 115 कोटी 11 लाख,खेळते भांडवल 207 कोटी 25 लाख,गुंतवणुक 63 कोटी 43 लाख तर बॅंकेचा समिश्र व्यवसाय 292 कोटी 52 लाख इतका आहे.ढोबळ नफा 2 कोटी 49 लाख झाला असून निव्वळ नफा 86 लाख 78 हजार रुपये झालेला आहे. ग्रौस एन पी ए 6.67 टक्के तर निव्वळ नफा 1.31 टक्के आहे. बॅंकेला स्थापनेपासुन ऑडीट वर्ग अ मिळालेला आहे तर सी आर ए आर 15.91 टक्के आहे.बँक स्थापनेपासून सतत नफ्यात असून बँकेस अ ऑडिट वर्ग मिळत आहे.तसेच बँकेने ग्राहक सेवा व आधुनिक बँकिंग सुविधा देण्याच्या हेतूने आयएमपीएस मोबाईल बँकिंग यूपीआय बँकिंग चा अवलंब केला आहे. तसेच एटीएम डेबिट कार्ड डिमांड ड्राफ्ट आरटीजीएस ,एनईएफटी एटीएम, सीटीएस क्लिनिंग, एस एम एस, तसेच मिस्ड कॉल इत्यादी सुविधा कार्यान्वित केल्या आहेत .

अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसामन्य शेतकरी, अल्पभुधारक ,ज्यांना राष्ट्रीय बॅंकाकडे पत नाही अशा लोकांना केंद्रीत करुन बॅंकिंग क्षेत्रात आणून त्यांची अर्थिक पत निर्माण करणे हे स्व.विलासकाका यांचे ध्येय होते.धनसंचयानातुन धनसमृध्दी,बेरोजगारांना ,गरजु तरुणांना अर्थपुरवठा करुन स्वतःच्या पायावर उभे राहुन आर्थिक जीवनमान उंचवावे.डॊंगरी व ग्रामीण भागात अर्थकारणातील दरी निर्माण करणेसाठी सहकारातील बॅंकांनी अर्थकारणांबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासत समाजकारण करावे असा त्यांचा नेहमी अट्टाहस असायचा .सहकारातील अर्थकारण अन राजकारण याचा कधीच मेळ घातला नाही .सहकारी संस्थांमध्ये राजकीय जोडे बाहेर ठेवूनच सहकारी संस्थांमध्ये कार्यकर्त्यांनी कार्यरत राहवे.ह्या त्यांच्या मुलमंत्राला बॅंकेच्या संचालक मंडळाने तडा जाऊन दिला नाही.

सर्वसामान्यांच्या पसंती असणा-या व सभासदांचा दृढ विश्वास संपादन करणा-या कोयना सहकारी बॅंकेच्या प्रगतीत बॅंकेचे संस्थापक चेअरमन व तालुक्यातील शिखर संस्थांचे मार्गदर्शक ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बॅंकेचे चेअरमन रोहित पाटील व्हा.चेअरमन विजय मुठेकर मुख्य कार्यकारी अधिकारी जनार्दन माने व सर्व संचालक मंडळ ,प्रशासन विभागाचे अधिकारी,कर्मचारी सभासद,ठेवीदार ,हितचिंतक यांचे मोलाचे योगदान आहे.बॅंकेच्या प्रांगणात लोकनेत स्व.विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ व प्रशासकीय कार्यालयाचा उद्घाटन समारंभ शेकाप चे आ.भाई जयंत पाटील यांचे शुभहस्ते,माजी महसुल मंत्री आ.बाळासाहेब थोरात,माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण,माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील,माजी मंत्री आ.सतेज ऊर्फ बंटी पाटील,माजी मंत्री जयंतरावV आवळे,आ.विश्वजीत कदम,खा.विशाल पाटील,आ.संग्राम थोपटे यांचे प्रमुख उपस्थितीत आज संपन्न होत आहे.
– रोहित पाटील
चेअरमन
कोयना सहकारी बँक लि, कराड

 

About the author

मुख्य संपादक : वसीम सय्यद

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!